युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
महर्षी वाल्मिकी गणेशत्सोव मंडळ, सायतच्या वतीने गावातील जि.प.शाळेत व गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण काल (दि. 31) करण्यात आले. महर्षी वाल्मिकी गुरुदेव सेवा मंडळ दरवर्षी नवनविन उपक्रम राबवित असते. मागच्या वर्षी मंडळाने स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले होते.
या वर्षी सुद्धा वृक्षारोपण, व मुलांना स्पर्धा परिक्षेचे ज्ञान व्हावे यासाठी उपक्रम मंडळाव्दारे राबविण्यात येतात.उपक्रम राबविण्यात मंडळाचे विक्रम र.मानकर,अमोल मानकर, अनिकेत इंगळे, योगेश मानकर ‘ गजानन ना.मानकर , संतोष मानकर , संकेत इंगळे , आकाश मानकर , ऋषिकेश मानकर , गौरव कुटेमाटे , सचिन सातव , आदित्य मानकर , आरू मानकर , भरत नितनवरे यांचा पुढाकार असतो.



