Home Maharashtra चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चेन्नई – बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबली…  — थांबा...

चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चेन्नई – बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबली…  — थांबा मिळाला,जंगी स्वागत…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         तब्बल 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चेन्नई – बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसला मूल मारोडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला. जंगी स्वागत करण्यात आले.बरेच वर्षांपासून चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला मुल – मारोडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. 

        अखेर तो निर्णय घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाने मुल मारोडा येथे चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबा दिला.मुल तालुका केंद्र असलेल्या गडचिरोली,चामोर्शी,पोभुंर्णा तालुक्यातील व्यावसायिक व नागरिकांना प्रवासासाठी सोय झाली आहे. 

     टहलियानी यांचा सततचा पाठपुरावा फळाला…

         चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे थांबा मिळावा यासाठी तिन चार वर्षा पासून कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोती टहलीयांनी यांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन व माजी मंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे सतत पाठपुरावा केल्यानेच ह्या मागणीला यश मिळाले हे सर्व शहरात आहे.मुल शहरात आनंदाचे वातावरण पसरले.

           शासन दरबारी लोकोपयोगी विषय लावून धरावा लागतो, मागणीचे महत्व पटवून द्यावे लागते व मोठी प्रतिक्षा सुद्धा करावी लागते. 

        टहलियानी यांनी गत 4 वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरूच ठेवला हे विशेष.टहलियानी यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे अखेर मूल मागोवा स्थानकावर ताबा मिळाल्याने ते अभिनंदनास पात्र ठरले. 

            मुल मारोडा रेल्वे स्थानकावर चेन्नई बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबली, जंगी स्वागत करण्यात आले. ह्या स्वागतासाठी कुषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मोती टहलीयांनी, मुल भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहुले, नगर परिषद माजी अध्यक्ष रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर सामाजिक कार्यकर्ता, माजी नगरसेविका गांडलेवार, पंकज लाडवे सामाजिक कार्यकर्ता, राजेंद्र चिंतावार,संजय चिंतावार, मुल शहरातील व्यापारी व नागरीक उपस्थित होते.