बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तीची सेवा म्हणजे ईश्वरसेवा,गोरगरीब लोकांचे सेवा, अपंग लोकांची सेवा, दिव्यांगाची सेवा म्हणजेच खरी ईश्वर सेवा, इंदापूर तालुक्यातील जनतेने मला आमदार केलं, राज्यमंत्री केलं, कॅबिनेट मंत्री केलं,आता कृषिमंत्री केले मी जनतेचे उपकार कधी विसरणार नाही.मी तुमच्यासाठी सतत तुमचाच आहे आणि तुमचाच राहणार आहे.असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग व वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी मंत्री भरणे बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, तहसीलदार जीवन बनसोडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर,संचालक श्रीकांत बोडके, किरण बोरा, सचिन सपकळ, अभिजीत तांबिले, अॅड शुभम निंबाळकर, बाळासाहेब ढवळे, वसंत आरडे दादा सोनवणे, दीपक जाधव, प्रशांत गलांडे, विठ्ठलराव ननवरे, धनंजय बाब्रस, प्रताप पाटील, गोटू पांढरे, पोपट शिंदे, आदी मान्यवर व विविध आजाराचे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टराचे पथक, दिव्यांग विभागाचे अनेक पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सारिका भरणे, श्रीराज भरणे तसेच भरणे कुटुंबातील इतर सर्व सदस्य इंदापूर तालुक्यातील आलेल्या महिला दिव्यांग, पुरुष दिव्यांग, बालक दिव्यांग या सर्वांची आपल्या घरातील सदस्य म्हणून विचारपूस करत होते.



