रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- आयुष्यात समाजासाठी वणवण फिरलो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु केली. अनेकांचे विवाह संबंध जोडण्याचे काम झाले.राजकारण केले. लोकांनी प्रेमाने निवडून दिले.जनतेची सेवा केली. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घातले. आता उर्वरित आयुष्य समाजाच्या सेवेसाठीच उरले आहे, ते समाजासाठीच वेचणार असे भावनिक उद्गार सामाजिक कार्यकर्ते परशुराम नन्नावरे यांनी काढले.
मदनापूर येथील जय लहरी जय मानव विद्यालयात आयोजित परशुराम नन्नावरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे होते.
प्रमुख अतिथी म्हणून माना आदिम जमात मंडळाचे यशवंतराव घोडमारे,कृषी अधिकारी भास्कर गायकवाड,कृषी तज्ज्ञ प्रभाकरराव सावसाकडे,अभियंता यादवराव घोडमारे,मदनापूर ग्रामपंचायत सरपंच गीता श्रीरामे सरपंच,काळे,मुख्याध्यापक भक्तदास जिवतोडे,लेखक सुरेश डांगे उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, भास्कर गायकवाड, यशवंतराव घोडमारे, संजय नन्नावरे, सुरेश डांगे यांनी परशुराम नन्नावरे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या सेवाभावी कर्तृत्वाची प्रेरणा येणाऱ्या पिढीने घ्यावी इतके अलौकिक कार्य परशुराम नन्नावरे यांनी केले असल्याचे गौरोवोदगार डॉ. गजबे यांनी काढले.वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात अनेकांनी रक्तदान केले.परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर बावनकर यांनी केले.संचालन कुशाब रोकडे तर आभारप्रदर्शन प्रदर्शन मुख्याध्यापक भक्तदास जीवतोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश दांडेकर,कुमराज चौधरी, मुरलीधर गायकवाड, प्रकाश केळझरकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



