Home Social मौजा उसेगांव नागरिकांना प्यायला मिळणार शुध्द पाणी…

मौजा उसेगांव नागरिकांना प्यायला मिळणार शुध्द पाणी…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

    चिमूर तालुकांतर्गत मौजा उसेगांव येथे नागपंचमीच्या दीवशी ग्राम पंचायतच्या वतीने फील्टर प्लँन्ट चा शुभारंभ करण्यात आला.

       बरेच वर्षापासुन उसेगांव येथे शुध्द पाण्यासाठी फील्टर प्लँन्ट ची मागणी होती.या मागणीची दखल उसेगांव ग्राम पंचायतने घेऊन उसेगांव वासीयांना पावसाळ्यात शुध्द पाणी उपलब्द करून दीले.

      पावसाळ्यात नदी,नाल्यांना गडुळ पाणी येत असते,अशुध्द पाणी पील्यामुळे त्यामुळे साथीचे आजार व पोटाचे वीकार होत असतात.आजार न होण्यासाठी शुध्द पाणी पीणे हा महत्वाचा घटक आहे.यामुळे शुध्द पाणी पीण्यासाठी वापरणे आवश्यक आहे.

       उसेगांव ग्राम पंचायतने २९ जुलैला नागपंचमीच्या दीवशी फील्टर प्लँन्टचे उद़्घाटन करून उसेगांव वासीयांना शुध्द पाणी उपलब्द करून दीले.

       यावेळी उसेगांवच्या सरपंच प्रियंका पाटील,उपसरपंच नीखील चाफले,ग्रामसेवक संजय ठाकरे,ग्राम पंचायत सदस्य कालींदाताई डांगे,मंगला दडमल,सुनीता कामडी,ब्रम्हा सांदेकर,अशोक कामडी व ग्राम पंचायत कर्मचारी,गावकरी मंडळी उपस्थीत होते.