Home Maharashtra ग्रामपंचायतीचा सरपंच पत्रकारावर अक्षरशः तुटून पडला! — तुला बघून घेतो म्हणत...

ग्रामपंचायतीचा सरपंच पत्रकारावर अक्षरशः तुटून पडला! — तुला बघून घेतो म्हणत घरात घुसून दिल्या शिव्यासह धमक्या…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

आंबटपल्ली :- लहानग्या पावलांना चिखलात रुतून चालावं लागावं,अंगणवाडीतल्या चिमुकल्यांनी शिक्षणासाठी कसरत करत चिखल ओलांडावा आणि हे वास्तव मांडणाऱ्या पत्रकाराच्या घरी सरपंच जाऊन त्याला ‘खालच्या पातडीवर’ धमकावावं हा लोकशाहीचा नव्हे तर गुन्हेगिरीचा पुरावा आहे!

      आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत कोडीगाव टोला येथील जिल्हा परिषद शाळेसमोर साचलेल्या चिखलाविषयी गोंडवाना महाराष्ट्र या पोर्टलवर पत्रकार पियुष गोंगले यांनी एक सत्यस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली. 

       शाळेतील मुलींची व अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांची होणारी हालअपेष्टा त्यांनी मोकळेपणाने जगासमोर आणली.

        पण लोकशाहीतील सकारात्मक बाब गावकऱ्यांच्या सेवेसाठी निवडून आलेल्या सरपंचाच्या पचनी पडली नाही.संतापाच्या भरात सरपंच उमेश कडते थेट पत्रकाराच्या घरी गेले आणि सुरू झाला धमक्यांचा आणि शिव्यांचा भडिमार!

        “आमच्या गावात येऊन आमच्यावर बातमी लावतोस?तुला काय वाटतं आम्ही काय झोपालोय का? तुला मारून टाकीन तुझ्या बापाची दादागिरी चालत नाही आमच्यावर!अशा प्रकारच्या असभ्य भाषेत सरपंचाने पत्रकाराला दमदाटी केली.

    गावातली वस्तुस्थिती दाखवणं म्हणजे गुन्हा आहे काय?

      पत्रकाराने केवळ बालकांच्या अडचणी मांडल्या होत्या.त्या दूर व्हाव्यात,शासकीय दुर्लक्ष संपावं यासाठी आवाज दिला होता. 

      पण याच आवाजाचा गळा दाबण्याचा प्रयत्न निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून होतोय,हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

       पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई होणार का?

      पत्रकार गोंगले यांनी आता पोलिसात तक्रार करण्याची तयारी दाखवली असून,संबंधित घटनेची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी,अशी मागणी होत आहे,

       सवाल असा की आज एखादा पत्रकार सुरक्षित नाही,तर उद्या गावातील सामान्य जनतेचं काय?