Home देशविदेश वैध्य,अवैध धंदे कधीच बंद होणार नाही….

वैध्य,अवैध धंदे कधीच बंद होणार नाही….

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादीका 

        वैध्य व अवैध धंदे म्हटले की इकडून तिकडचा आर्थिक व्यवहार!,”हा व्यवहार कमी व मोठ्या प्रमाणात अनेकांना लाभ पोहचवतो आहे.यामुळे अशा धंद्याकडे लक्ष देणे व दुर्लक्ष करणे आता सोयीचे झाले आहे.

        देशी विदेशी दारुचा वैध धंदा करणारे हे सुद्धा रुपये कमावण्याच्या नादात अवैध व्यवसायाला चालना देतात हे असत्य नाही असे मानले तर अवैध व्यवसाय हे सुद्धा त्यांची जननी आहे हे तर कबूल करावेच लागेल.

            सट्टा,अवैध दारु व्यवसाय,सुगंधीत तंबाखू,गांजा,चरस,आणि सरकारच्या यादी प्रमाणे इतर व्यवसाय हे अवैध आहेत.सामाजिक दृष्टीने हानिकारक आहेत असे म्हटले जात आहे.

          हेच व्यवसाय लाखो कुटुंबांची राखरांगोळी करतात,आणि काही मोजक्या कुटुंबांची आर्थिक उभारणी करतात.त्यांना आर्थिक आधार देतात.याला मुख्यत्वे काय कारण तर भस्मासुर बेरोजगारी?हे मान्य करावेच लागेल..

          जेवढे अवैध व्यवसायांनी बरबाद केले नाही तेवढे शासन मान्य दारुच्या व बारच्या दुकानांनी तर या देशातील करोडो नागरिकांना बरबाद करुन सोडले आहे.विविध दारुच्या नशेत करोडो नागरिकांची होत असलेली आर्थिक,शारीरिक आणि मानसिक हानी बघता,याला जबाबदार शासनच आहे असे म्हणायचे काय?

           आता तर दारु,सट्टा,गांजा,चरस,सुगंधीत तंबाखू सर्व ठिकाणी बघायला मिळतात अशी लोक चर्चा आहे.या लोक चर्चेला गृहीत धरले तर भरमसाठ अवैध व्यवसायाचे पालकत्व कोणी व कशासाठी स्विकारले आहे?हा प्रश्न अधिकच गंभीर नाही काय…

          जिथे जिथे मान्यताप्राप्त देशी,विदेशी दारुची दुकाने नाहीत,तिथे तिथे दारुचा अवैध व्यवसाय वैध्यपणे चालतो आहे.

       याचबरोबर सट्टापट्टीचे जाळे देशभर पसरले असून शहरापासूनच्या तर ग्रामीण भागापर्यंतच्या लोकांपर्यंत सट्टा हा खेळ जम बसवून आहे..

         याचबरोबर तंबाखू,गुटखा,चरस,गांजा यांनीही मानवी मनावर राज्य करणे सुरू केले आहे.

           एकंदरीत अवैध व्यवसाय हे शासनाच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरु आहेत असे का म्हणून म्हनू नये?या विचारात जनता गुरफटून आहे.

      वैध्य दारु व्यवसाया अंतर्गत व्यसनाधीन व नशेला समाज बनवून ठेवणे हे शासनाचेच धोरण असल्याने लोक आपापल्या इच्छा व्यसनाधीनतेला अनुसरून करतात हे एक सत्य आहे.

         यामुळे अवैध व्यवसाय कधीच बंद होणार नाही हे परम वास्तव आहे…