ऋषी सहारे
संपादक
धानोरा तालुक्यातील पन्नेमारा गावांतर्गत येणारा होचेटोला हे गाव अगदी नदी लगत असून काल दिनांक 30/6/2025 ला गरोदर महिलेला दवाखान्यात हलवण्याकरिता ऍम्ब्युलन्स ची सुविधा केली होती परंतु नदीला पूर असल्यामुळे शक्य झाले नाही.
शेवटी महिलेला आपल्या राहत्या घरीस डीलवरी झाली.त्या महिलेला जर कमी जास्त् झाल असत तर याला कोण जबाबदार असता असा प्रश्न निर्माण होतो आणि येथील टोल्यातील नागरिकांना योग्य तो रस्ता व पूल नसल्याने व वारंवार शासनांकडे सुद्ध ह्या मुद्याला घेऊन सांगितले जाते परंतु दखल घेत नाही मग कराव काय? कोणाकडे नेमक सांगितलं पाहिजे? असा नागरिका मध्ये प्रश्न पडतो आहे.
दरवर्षी हिच स्थिती पावसाळ्यात असते तरी शासनाकडून लवकरात लवकर नदीला पुल बांधून द्यावे अशी मागणी होत आहे.



