Home Maharashtra मोटेगांव येथील इसम वाघाच्या हल्ल्यात ठार…

मोटेगांव येथील इसम वाघाच्या हल्ल्यात ठार…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी

      चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मोटेगांव येथील दिलीप जानबा नन्नावरे वय ५० वर्षं हे काल सकाळला ७ वाजता शेळ्या राखण्यासाठी पेंढरी रोड कक्ष क्रमांक (३८) जंगल परिसरात गेले होते.

        शेळ्या घरी परत आल्या,मात्र दिलीप नन्नावरे १२.३० वाजले तरी घरी परतले नाही.यामुळे गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोध घेतला असता पेंढरी जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.

             याची माहीती वनविभागाला देताच,तात्काळ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.नेरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तोडासे,सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) गायकवाड ब्रम्हपूरी,वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार तळोधी हे स्थळ पंचमाना वेळी उपस्थित होते.

      ही घटना कक्ष क्रमांक (३८)पेंढरी जंगल परिसरात घडली.मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले.

      वनविभागाकडून अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांना तात्काळ ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.