Home Maharashtra वाघाच्या बच्छडाचा उष्मघाताने मृत्यु….

वाघाच्या बच्छडाचा उष्मघाताने मृत्यु….

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी

     नियत क्षेत्र पिपर्डा,कक्ष क्रमांक ५६१/५६४,उपक्षेत्र पळसगाव,वन परिक्षेत्र पळसगाव येथे वाघाच्या बछडाचा उष्मघाताने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

     सदर बच्ड्याचे वय अंदाजे २/३ महिने असावे असा अंदाज वनक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांचा आहे.

     वाघाचा बच्छडा उष्मघाताने मृत्यू झाल्याचे कळताच उपसंचालक लेफ्टनंट कुशाग्र पाठक,सहाय्यक वनसंरक्षक साईतन्मय डूबे,वनपरिक्षेत्राधिकारी सागर बारसागडे,क्षेत्र सहाय्यक सी.एन.रासेकर,वनरक्षक डी.बी.खार्डे,वनरक्षक व्हि.एन. दुधे,वनरक्षक वनिता माहुरकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व स्थळ पंचनामा करून बच्छड्याचा अंत्यसंस्कार करण्यात आलाय.