ब्रेकिंग न्युज… — अंजनगाव सुर्जीत उष्माघाताचा पहिला बळी,बेवारस स्थितीत नविन बस स्थानक परिसरात आढळून आला ४० वर्षीय इसमाचा मृतदेह…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

       दिवसेंदिवस सुर्य आग ओकत असून तापमानात वाढ होत आहे त्यामुळे या तापमानाची झळ पशू पक्षासह माणसाला होत आहे अशातच अंजनगाव सुर्जी येथे उष्माघाताने पहिला बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

           स्थानिक बस स्थानक परिसरात आज शनिवार दिनांक १ जुन रोजी सकाळी १० वाजता उष्माघाताने एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.त्याचा मृतदेह नविन बस स्थानक परिसरातील रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत आढळून आला.

           राजू ईश्वर घनघोर वय ४० वर्ष रा.अजीजपुरा अंजनगाव सुर्जी असे मृतक इसमाचे नाव आहे.मृतक याचा उष्माघाताचा मृत्यु झाल्याने शहरात खळबळ उडाली.

            परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना मृतक इसम हा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसल्याने त्यांनी मृतक इसम यांची ओळख पटवून नातेवाईकाला फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले.

           मृतक इसमाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून मृतक इसमाला राहत्या घरी अजीजपुरा नेल्याची माहिती प्राप्त झाली.