रोडवरील गरजू लोकांचा आधार बनतोय शुभम पसारकर…

 

ऋषी सहारे

संपादक

 

  आरमोरी मधे राबविण्यात येणाऱ्या शोध मोहीम द्वारा अनेक लोकांची कटिंग , दाडी, व मेकओवर करण्यात आला व तसेच ज्यांच्या कडे कपडे नाही अश्या लोकांना कपडे देण्यात आले आणि या मधे शुभमचे चांगल काम बघून आरमोरी मधील काही लोक सुद्धा त्यांना त्यांच्या कामासाठी सहकार्य करत आहे आणि तसेच आरमोरी पोलीस स्टेशनच सुद्धा शुभमच काम पाहून खूप उत्कृष्ट रित्या सहकार्य आढळून आला

आणि आतापर्यंत अशा १५,००० हून अधिक अधिक ग़रजू लोकाना आधार देंन्यात आला, ज्यांना घरी पाठवणे शक्य नसते त्यांना ते सेवाभावी संस्थेत पाठवून त्यांच्या उपचाराची व्यवस्था करून देतात .रस्तावरील फिरणाऱ्या 

मनोरुग्णांना जेवू घालने, त्यांना कपडे देणे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे काम देखील ते करतात तसेच या शोध मोहीम मधे जे काही कार्य करण्यात आले त्यात दिव्य वंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम पसारकर, रवींद्र चौखे (सहायक फौजदार पोलिस स्टेशन आरमोरी) , वैद्यराज हरिदास चापले , ज्ञानेश्वर नैताम , ( समाजसेवक), संजय बुटके, सुषमा गलगले, लावण्या येकुचेवार, नीलिमा धोडरे, कांचन निकोडे , दीक्षा अल्लूरी , प्रियंका पेटकर, सुप्रिया कंकलवार यांचा सहभाग होता .