Home Political आजपासून आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचा आरमोरी विधानसभा क्षेत्रात दौरा…

आजपासून आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचा आरमोरी विधानसभा क्षेत्रात दौरा…

ऋषी सहारे 

    संपादक 

आरमोरी – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ता संघटनात्मक सभेचे आयोजन आ.डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत केले आहे.

          दिनांक ०१ एप्रिल रोज बुधवारला सकाळी ११:५० वाजता गोटूल भवन दर्रोटोला कोरची, दिनांक ०२ एप्रिल रोज गुरुवारला सकाळी ११:५० वा. किसान मंगल कार्यालय कुरखेडा, दिनांक ० ३ एप्रिल २०२६ रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजता सिंधी भवन देसाईगंज व दुपारी ०३ वाजता केमिस्ट भवन आरमोरी येथे कार्यकर्ता संघटनात्मक सभा होणार आहे.

            या संघटनात्मक सभेला आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे सोबत जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस तथा गटनेता मोहम्मद युनूस शेख, प्रदेश सचिव प्रा.ऋषीकांत पापडकर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदु नरोटे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा तनुश्री आत्राम, रा.का.महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा डॉ.सोनल कोवे, रा. यु. काँ. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, रा. काँ. पा. जिल्हा उपाध्यक्ष जेसा मोटवानी, आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर तलमले, सहअध्यक्ष सुनिल नंदनवार तसेच सर्व जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा सचिव, जिल्हा संघटन सचिव उपस्थित राहणार आहेत.

           कोरची, कुरखेडा, देसाईगंज, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.