Home देशविदेश सिंदेवाही तालुक्यात जंगलात चार पाच दिवसापासून हत्तीचा मुक्काम… — पिकांचे नुकसान,शेतकऱ्यांमध्ये...

सिंदेवाही तालुक्यात जंगलात चार पाच दिवसापासून हत्तीचा मुक्काम… — पिकांचे नुकसान,शेतकऱ्यांमध्ये दशहत, विजेचा खांब पाडला…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

दखल न्यूज़ भारत

 

चंद्रपुर:

सिंदेवाही ओडीसा राज्यातून छत्तीसगड महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर हतीचा मुक्काम सध्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात असल्याचे कळते. सविस्तर वृत्त असे की ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोली च्या जंगल मार्ग वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी नंतर सावली नागभीड तालुक्यातील जंगलात मागिल पंधरा विसर दिवसापासून जंगल परिसरात फिरत आहे. त्यातच नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी परीसरातुन सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार जंगलात दाखल झाला आहे.

          सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या गावात मागील दोन ते तीन दिवसांपासून हत्तीने शेतशिवारात थैमान घातले आहे. यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

           रात्रीच्या सुमारास जंगललगत असलेल्या 20 शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले असल्याची घटना 12 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. या हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांब सुद्धा पाडला होता . शेतातून हत्ती पिके तुडवित असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

            त्यानंतर हत्तीने आपला मोर्चा मरेगाव धानोरा मार्गे लोनखैरी या गावाकडे इकडे वळविला. नंतर दुसर्‍या दिवशी हत्तीने परतीचा प्रवास करीत चिकमारा गुंजेवाही जंगलाकडे वळवला असुन आज सकाळी पवनपार जंगलातून जात असल्याने तो परतीला जात यावरुन दिसुन येत आहे, कारण या परीसरातुन मागील पंधरा दिवसांत आढळून आलेल्या ऐकारा भुजबळ जंगल लागुन आहे. त्यामुळे नर आता कोणाकडे आपला मोर्चा वळविला हे सध्या तरी कोणीही हमखास सांगु शकत नाही. 

         वनविभागाने हत्ती द्वारा केलेल्या आजपर्यंत शेतीची नुकसानभरपाई देण्यात यावी व वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

      सध्या हत्ती आपला प्रवास रात्रौच्या सुमारास करीत असल्याने हत्तीचा कोणताही त्रास होताना दिसुन येत नसल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

           हे विशेष हत्तीच्या नियंत्रणासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. हतीच्या दहशतीत राहण्याची गरज नसून अजूनपर्यंत मनुष्यावर हल्ला केल्याचे दिसत नाही. केवळ हत्तीला बघण्याची गर्दी करत असताना सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले असल्यास वनकर्मचाऱ्यांकडे अर्ज द्यावे, पंचनामे तत्काळ भरून नुकसान भरपाई देण्यात येईल.

विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही..