नाते विश्वासावर चालतात.विश्वासात भावना असेल तर ते टिकाऊ विश्वास राहत नाही.विश्वासात जर विचार असतील तर तो विश्वास टिकाऊ असतो.भावनाप्रधान माणसे एकमेकापासून तुटतात,तर विचारप्रधान माणसे टिकून राहतात.म्हणून नाते जोडताना विचारपूर्वक जोडले पाहिजेत.भावनेच्या भरात येऊन नाते जोडू नये.
कौटोंबिक नाते,मित्रत्वाचे नाते आणि उद्योग व्यवसायातील नाते असे नात्याचे तीन प्रकार करता येतील.उद्योग आणि व्यवसायातील नाते हे तांत्रिक असते.त्यात भावभावनांना महत्व नसते.तरी विश्वासाला महत्त्व द्यावेच लागते.कारण कार्यालयीन काम त्यातील बॉस आणि कर्मचाऱ्यांचे नाते हे विश्वासाचे असले तरच कार्यालयीन कामास गती येते,अन्यथा त्यात शिथिलता येते.याच प्रमाणे शेती कारखाना उद्योगात मालक आणि श्रमिकात विश्वासाचे नाते हवेच,तरच ते जोमाने चालतात.अर्थात आर्थिक आणि तांत्रिक नाते संबंध असले तरी मालकांनी श्रमिकांचा विश्वास संपादन केलाच पाहिजे,व्यवहारात विश्वासघात केला,किंवा श्रमिकांनी कामचुकारपणा केला तरी संबंध बिघडतात.
मित्रप्रेमात आणि कौटोंबिक नात्यातील प्रेमात तांत्रिक वा आर्थिक संबंध किंवा व्यवहार नसतो ( नसायला पाहिजे ). मित्रत्वाचे नाते आणि कौटोंबिक नाते हे पूर्णतः प्रेमावर चालते.आणि प्रेम हे विश्वासावर चालते.विश्वासघात झाला की प्रेम संपते,प्रेम संपले की,त्याच्यातील गोडी संपते.नव्हे बऱ्याचवेळा ते नाते पण संपते.
मैत्रीचे नाते आणि कौटोंबिक नाते यात फरक असतो.कौटोंबिक नाते हे रूढी परंपरा आणि अलिखित कायद्यावर चालतात.त्यात बिघाड आला की,विश्वासाला ठेच पोहचते,म्हणून प्रेम कमी कमी होत जाते,आणि एके दिवशी कौटोंबिक नाते संपुष्टात येते.उदा. मुले मुली आई वडिलांसंबंधीचे कर्तव्य नाही केले तर ,पतिपत्नीने आपापली जबाबदारी पार नाही पाडली तर,भाऊ बहिणींनी एकमेकांच्या सुखदुःख प्रसंगी हजेरी नाही लावली तर,भावाने बहिणीला प्रसंगी काकन चोळी नाही केली,धोंडे खायला नाही बोलावले,दिवाळीला नाही बोलावले,बहिणीने भावला नाही ओवाळले,राखी नाही बांधली तर,तर कदाचित प्रेम संपते,किंवा प्रेम जर असले तरी नातेसंबंध बिघडतात.
आता या नात्यातील प्रेम भावनेवर चालते की विचारावर? यावर विश्वास बसणे आणि तुटणे हे अवलंबून असते.श्वास गेला की जीव जातो,तसेच विश्वास संपला की जीवन संपते.म्हणजेच जसा जीव हा श्वासावर अवलंबून असतो,तसे जीवन हे विश्वासावर अवलंबून असते.म्हणून आनंदी आणि सुखाचे प्रेमाचे जीवन जगायचे तर विश्वास फारच महत्त्वाचा असतो.म्हणूनच विश्वासघात करणे हे पाप आहे.आणि जो करतो तो पापी आहे,असे तत्वद्न्यान निर्माण झाले आहे.
प्रेम आणि विश्वास याबद्दल विचार करताना ते एकमेकावर अवलंबून आहेत,किंवा जीवन या नाण्याच्या दोन बाजू आहेत,हे समजून घेतले पाहिजे.परंतु हे समजून घेताना हेही समजून घेण्याची गरज आहे, ती ही की,भावना भक्ती श्रद्धा यांचा आधार घेऊन विश्वास ठेवला तर तो फार काळ टिकणार नाही.कारण असा विश्वास सत्यावर आधारित नसतो.सत्य हे टिकाऊ असते.सत्य हे तर्क अनुभव प्रयोग विद्यान,याने सिद्ध होत असते.म्हणजेच सत्य विचारावर टिकते,आणि विचार हे सत्यावर टिकतात.म्हणून विश्र्वासातील सत्यता पडताळून पहिली की, तो खरा की खोटा हे सिद्ध होते.जसे पितळ की सोने हे पाहण्यासाठी सोनार जो पदार्थ वापरतो,तो पदार्थ म्हणजे विचार होय.विचाराने पारखून केलेले प्रेम आणि सोयरिक ही टिकाऊ राहते,आणि केवळ भावनेत येऊन केलेले प्रेम किंवा जोडलेले नाते हे त्या पितळ प्रमाणे असते.ते सोने नसते,म्हणजेच खोटे तकलादू असते.कारण त्यात विश्वासघात असतो.काहीतरी लपवलेले असते म्हणूनच जग फसते.नाते बिघडतात.
मित्रमैत्री प्रेम,प्रियकर प्रियशिचे प्रेम ,नवराबाकोचे नाते यातील विश्वास जर केवळ सेवा भक्ती श्रद्धा म्हणून म्हणजेच भावनेवर असतील तर ते तकलादू असतात,आणि ते जर विचाराचे नाते किंवा त्यातील प्रेम असेल तर ते टिकते.हे निर्विवाद सत्य स्वीकारावेच लागते.
सोयरिक होताना जर मुलीचे किंवा मुलाचे इतर कुणाशी संबंध असले आणि ते तुटण्यासारखे नसतील तर त्यांनी लग्नच करता कामा नये.आईबापा नी पण आपल्या उरावरचे ओझे खाली करण्यासाठी कुणाचा विश्वासघात करू नये.कारण सोयरिकि मध्ये काहीच लपून ठेऊ नये.कारण सत्य कधीच लपत नसते.ते कधीना कधी बाहेर येते.सत्य लपत नाही. सूर्यावर ढग आले तर तो लपला असे समजू नये.ढग जाणार आणि सूर्य बाहेर पडणारच.म्हणून आपले घरदार,शेतीवाडी,उद्योगधंदा,आपले नातेवाईक हे काहीच लपविता कामा नये.जेव्हढे सत्य बोलाल तेव्हढे नाते आणि त्यातील प्रेम टिकाऊ असते.म्हणून भावनेत येऊन काहीही बोलू नये.बोलण्यात जागृती असावी.प्रकाश असावा.यालाच विचारपूर्वक केलेले प्रेम आणि नाते म्हणतात.अविचारी नाते प्रेम धोका देणारेच असते.
या विषयाची दुसरी बाजू असे की,समजा आपण आपल्या जीवनात काही लपविले असेल किंवा चुकीचे निर्णय घेतले असतील तर ती चूक कशी सुधारायची ? हा पण महत्त्वाचा विषय आहे.झालेली चूक सुधारता येते,पण तिथे पण विचाराचचाच आधार घ्यावा लागतो.भावनेच्या भरात येऊन चूक सुधारता येत नाही.दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असते.कारण विचारवंतानी म्हटले आहे की,man is the bindal of misteks. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो चुका करणारच.कळत अथवा न कळत,तरी त्या सुधारता.पण येतात,याचे भान असणे जरुरीचे आहे.शिवाय चूक माफ करायला आधी आपल्यातील जनावरपण सोडून माणूस बनावे लागते.राक्षसाचा माणूस बनून निर्णय घावे लागते.दया क्षमा शांती,सत्य न्याय नीती या तत्वाच्या आधारे चुका माफ करता येतात.कारण हे तत्व माणसाकडेच असतात.या तत्वांचा अंगीकार केला तर गुन्हेगाराला पण माफ करून,त्यास माणूस बनविता येते.दुर्जनाला सज्जन बनविता येते.पण माफ करण्यासाठी फारच मोठे मन आणि मोठे विचार याचा आधार घ्यावा लागतो.गुन्हेगाराला चूक सुधारण्याची संधी द्यावी लागते.यात महत्त्वाची गोष्ट ही की,गुन्हेगाराने माफ करणाऱ्यांचा विश्वासघात करता कामा नये.शिवाय घातपात होणार नाही,याची खात्री विश्वास गुन्हेगार माणसाने देणे जरुरीचे आहे.
या सगळ्यात शेवटी विचाराची देवाण घेवाण,आपण चुका का केल्या ? त्या मागची मजबुरी कारणे,असा पडताळा घेऊन ,असलेली परिस्थितीचा स्वीकार करून,सामंजस्य घेऊन,तडजोड करून मार्गक्रमण करणे,हेच शहाणपानाचे ठरते.हे शक्य नसेल तर शेवटी रोज उठून भांडणे मारामाऱ्या खुणखराबी करीत राहण्या पेक्षा दोघांच्याही म्युचुअल अंडरस्टँडीने म्हणजे आपसी समज ने एकमेका पासून विभक्त होणे केव्हाही चांगलेच .
म्हणून नाते कोणतेही असो,मैत्रीचे वा कौटोंबिक त्या नात्यात प्रेम असणे,ते टिकविण्यासाठी विश्वास असणे,आणि विश्वास हा भावनेपेक्षा विचाराने टिकविणे हे हितकारक असते.



