राकेश चव्हाण
कुरखेड तालुका प्रतिनिधी
वडसा ते अर्जुनी या मार्गाच्या तात्काळ दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज रविवारी दि.१४ जून २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात होणार असल्याचे आवाहन पत्रकातून सांगण्यात आले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र निधी मंजुरीस विलंब होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांचा वाढता त्रास,वारंवार होतं असलेले जीवघेणे अपघात या मुद्द्यांवर आंदोलनातून आवाज उठविण्यात येणार आहे.
हे आंदोलन आज सायंकाळी ४ वाजता वडसा – अर्जुनी टी पॉईंट, देसाईगंज (वडसा) येथे होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर या आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून आवश्यक असलेल्या रस्तादुरुस्तीच्या मागणीला कांग्रेस च्या आमदारांच्या आंदोलनला शासन स्तरावर किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



