राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
देसाईगंज :- जनसेवा आणि माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना कुरुड-कोंढाळा मार्गावर घडली. या मार्गावर झालेल्या अपघातात एका म्हशीचा पाय मोडला असून वाहन चालक जखमी झाला.
दरम्यान, आपल्या दौऱ्यावर परतत असताना ही दुर्घटना पाहताच आमदार रामदास मसराम यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून मदतकार्य हाती घेतले.
घटनेची माहिती मिळताच आमदार मसराम यांनी जखमी वाहन चालकासाठी तातडीने 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या म्हशीच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण केले.
माणूस असो किंवा मुका प्राणी, संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे नेतृत्व म्हणून आमदार रामदास मसराम यांचे पुन्हा एकदा संवेदनशील मानुसकी व्यक्तिमत्त्व समोर आले आहे. त्यांच्या या तत्परतेचे आणि मानवतावादी भूमिकेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
“सेवेचा ध्यास, माणुसकीचा श्वास” या उक्तीची प्रचिती देणारी ही घटना नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.



