राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील श्री गुरुदेव भजन मंडळ, नवरगाव (आंधळी) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दिनांक ६ जून २०२६ रोजी भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी भजन मंडळातील मुख्य तबला वादक श्री. किसन कडगु गेडाम, हार्मोनियम वादक श्री. केवळराम तुळशीराम उईके तसेच भजन गायक श्री. भुवन चिंतामण नाकाडे, श्री. मुरारी गोविंदा मडावी, श्री. वामन नारायण गेडाम, श्री. गिरीधर जगन गेडाम व श्री. राजीराम कोसरे यांनी आपल्या सुरेल गायनाने व वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यास मा. हेमंत सेंदरे, दशरथ लाडे, प्रल्हाद खुणे, धनंजय पिलारे, साईनाथ नाकाडे, नारायण नाकाडे, माणिक दरवडे व साईनाथ सांगोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि आदर्श विचारांचे स्मरण करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ, नवरगाव (आंधळी) यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



