वृत्तवेध
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
मौजा शिवणपायली येथील नळयोजनांतंर्गत पाणीपुरवठा तात्काळ सुरु करण्याबाबत,”ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूरचे उपविभागीय अभियंता आणि सिरपूर प्रशासक व ग्रामसेवकांना,चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी निर्देश दिले आहेत.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथील नळयोजना बंद पडल्याने तेथील नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.याबरोबर मौजा शिवणपायली येथे पाणी समस्यांनी उग्ररुप धारण केले आहे.
मौजा शिवणपायली येथील पाण्याच्या समस्या दुर्भिक्ष झाल्याबाबत व नळयोजनां ठप्प पडली असल्याबाबत,”दखल न्यूज भारत वेब पोर्टला बातमी प्रकाशित होताच,चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी बातमीची दखल घेत,मौजा शिवणपायली येथील नळयोजना तात्काळ सुरु करण्याचे निर्देश चिमूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता तथा सिरपूर गटग्रामपंचायतचे ग्रामसेवक भसारकर यांना दिले आहेत.
यामुळे मौजा शिवणपायली येथील नळयोजनातंर्गत पाणीपुरवठा लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



