लक्षवेधी
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
मागील ७ दिवसांपासून पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प पडली असल्याने मौजा शिवणपायली येथे पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे.यामुळे या गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
मौजा शिवणपयली गाव सिरपूर गटग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असून संबंधित प्रशासक आणि ग्रामसेवक हे मौजा शिवणपायली येथील नागरिकांना,(भर उन्हाळ्यात) पाणी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात येत असलेल्या मौजा शिवणपाली येथील नागरिकांसाठी पाणी पुरवठा सुरळीत करण्यास चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी विशेष लक्ष द्यावे अशी आर्त हाक तेथील नागरिकांची आहे.
मात्र मौजा शिवणपायली येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणे बंद झाले असल्यामुळे तेथील प्रशासक सरपंच आणि ग्रामसेवकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे,असेच त्यांचे महत्त्वपुर्ण कर्तव्य आहे.
तद्वतच नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) राबविल्या जातात. जल जीवन मिशन (JJM) आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रमुख योजनांद्वारे जलसंकट निवारण केले जाते हे संबंधितांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.



