Home Maharashtra पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे :- गणेश येरमे… — जागतिक पर्यावरण...

पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे :- गणेश येरमे… — जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       प्रत्येकाने परिसरात एक झाड लावून,पर्यावरण व झाडे रक्षणासाठी पुढे यावे असे मत ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यानी व्यत केले.

      कोलारा ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आले व स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

      कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक सरपंच शोभा कोयचाडे,गणेश येरमे,ग्राम अधिकारी संजय ठाकरे,मधुकर जिवतोडे,क्षेत्रसहायक मेडुलकर,वनरक्षक शिवा रोकडे,झिरो वेस्ट प्रमुख प्रिती व दिपा यांची उपस्थिति होती.

       तसेच गावातील ग्रामसंघ महिला व नागरिकांनी सहभाग घेतला.वाढते प्रदूषण,हवामान बदल आणि जंगलतोड यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

       वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्यास हातभार लागतो,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

       कार्यक्रमाच्या शेवटी लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची सामूहिक जबाबदारी घेण्याचा निर्धार करण्यात आला.