शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे वृक्षांची लागवड करुन व वृक्षांच्या संवर्धनाची हमी घेत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्ष हे केवळ निसर्गाचे अलंकार नसून मानवाच्या अस्तित्वाचा आधारस्तंभ आहेत.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकसहभागातून अधिक व्यापक करणे आवश्यक आहे असे सरपंच गजानन गुळधे यांनी म्हटले आहे.

वृक्ष लागवड प्रसंगी सरपंच गजानन गूळधे,श्री.गुप्ता ग्रामसेवक,श्री.गुरनुले क्षेत्र सहाय्यक खडसंगी,श्री.बोपचे वनरक्षक,वर्षाताई ननावरे माजी उपसरपंच,आशिनाताई नन्नावरे माजी ग्रामपंचायत सदस्य,भाग्यवानजी ढोणे,दिनेश कोडापे,कैलास जांभूळे, सुरज जांभुळे,समीर चौधरी,रुपेश जांभुळे व गावातील महिला तसेच पुरुष मंडळी उपस्थित होते.



