या देशात या RSS / भाजपने गेल्या 12 वर्षात एवढेच काम केले की,त्यांनी अल्पसंख्यांकांच्या आणि बहुजनांच्या मेंदूत भीती आणि नकारात्मकता पेरली आणि ते यशस्वी होताना दिसत आहेत.
डोळस श्रद्धाच माणसाची प्रतिभा विकसित करून विज्ञानवाद आणि विवेकवाद स्वीकारण्यास भाग पाडते.
आणि हाच विज्ञानवाद आणि विवेकवाद माणसाला मानवतावाद शिकण्यास भाग पाडतो. एकदा हा मानवतावाद एखाद्या माणसाने आत्मसात केला,की तो त्या विचाराचे जीवनभरात निदान 1000 माणसे तयार करतो. केवळ शुद्ध आणि पारदर्शक आचरणानेच.नेमके हेच या संविधानविरोधी आणि मानवताविरोधी RSS /भाजपला देशात वाढू द्यायचं नाही.
त्यांच्या त्या कू -विचारसरणीच्या विरोधात ज्या ज्या तत्ववेत्ते महापुरुषांनी दंड थोपटून त्यांना धूळ चारली,भ.बुद्ध,सॉक्रेटीस,प्लेटो,ऍरीस्टॉटल,संत कबीर,म.फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा इत्यादिंची ऊर्जा त्यांनी प्रतिमेत आणि स्मारकात बंदिस्त करून टाकायला भाग पाडली,आणि हाच अल्पसंख्यांक व बहुजनवर्ग RSS च्या जाळ्यात अलगद अडकला.महापुरुषांनी शिकविलेले आत्मविश्वास प्रगल्भ करण्याचे कौशल्य गमावून बसला.म्हणून प्रत्येक गोष्टीत त्याला आज केवळ आणि केवळ नकारात्मकताच दिसत आहे.
ज्याप्रमाणे सागराच्या तळाशी मोती सापडतात अगदी त्याप्रमाणेच…….
वरून वरून दिसणाऱ्या सकारात्मकतेत अगदी तळाशी नकारात्मकता दडलेली असते, तर वरून वरून दिसणाऱ्या नकारात्मकतेत तळाशी सकारात्मकता लपलेली असते.
म्हणून या लपलेल्या सकारात्मकतेला पटलावर आणायचे असेल तर या नकारात्मतेला कायमचे उखडून फेकावे लागेल. तेंव्हाच ही नपुसंक RSS/ भाजप ( जी कधीही वैचारिक वाद घालण्यास मैदान सोडून पळणारी आहे ) शक्ती भेदरल्याशिवाय राहणार नाही.
त्याचे एक उत्तम ऐतिहासिक उदाहरण येथे देतो.
सम्राट कनिष्क आपल्या राज्यकारकिर्दीत दरवर्षी अनेक धर्मोपदेशकात एखाद्या विषयावर महाचर्चा आयोजित करत असे. त्या वादविवादात जे धर्मोपदेशक जिंकत असत त्यांना अनेक नजराने सोन्याच्या मोहरा भेट देऊन त्यांचा उचित सन्मान करत असे. जे धर्मोपदेशक हरत असत त्यांना हद्दपारीची शिक्षा भोगावी लागत असे. यामध्ये ब्राम्हण मात्र दरवर्षी बाजी मारत असत.
एका वर्षी या वादविवादात ब्राम्हण हरले आणि भिखू संघ जिंकला.तेंव्हा प्रथेप्रमाणे ब्राम्हण हद्दपार व्हायला पाहिजे होते आणि भिखू संघाचा यथोचित सन्मान व्हायला पाहिजे होता.भिखू संघाचा सन्मान तर झाला.
परंतू हरलेल्या ब्राम्हणांनी हद्दपारीची शिक्षा न स्वीकारता उलट सम्राट कनिष्काचीच हत्या करण्याचा कट रचला. हे जेंव्हा सम्राट कनिष्कला समजले, तेंव्हा त्याने त्या ब्राम्हणांची हत्या केली आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
या उदाहरणातून अल्पसंख्यांक आणि बहुजनांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की RSS /भाजप हे विचार आणि आचार नसल्याने ते वैचारिक वाद / विवाद सहन करूच शकत नाहीत. म्हणूनच तर ते अल्पसंख्यांक आणि बहुजनांना आपल्याच कुसांस्कृतिक गुलामीत कायमचे ठेवण्यासाठीच कूटनितीचा वापर करत काट्याने काटा काढतच त्यांनी नामर्दूमकीचा इतिहास गाजवला.
आणि आज साऱ्या देशात न्यायालय,सामान्य प्रशासन,पोलीस प्रशासन,राजकीय सत्ता केंद्र आणि राज्यात अनैतिक मार्गाने हिरावून घेऊन, विरोधी पक्षांचे (प्रादेशिक आणि राष्ट्रीय ) पंख छाटून संविधानिक मार्गानेच पाऊल न वाजवताच सर्व यंत्रणा ताब्यात घेतली आणि त्याच संविधानिक मार्गाने संविधान संपविण्यास कंबर कसून निघालेत. ही त्यांची कुटनीती!
परंतू ,प्रत्येक संविधाननिष्ठ भारतीय नागरिकाने माझ्यासारखा दृढसंकल्प केलाच पाहिजे की मी माझ्यातली नकारात्मकता कायमची उखडून फेकेन आणि सकारात्मकता पटलावर आणून या RSS वादी भाजपला 2029 मध्ये या देशातून EVM सहित हद्दपार करेन.
हाच आत्मविश्वास मी दृढ करून त्यासाठी आताच कामाला लागेन. आणि माझे संविधान, माझे मूलभूत अधिकार आणि लोकशाहीचे रक्षण करेन. त्यासाठी मुख्य निवडणुक आयोग, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, CJI, कोणत्याही मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस प्रशासन यांच्या विरोधात रस्त्यावरच्या आंदोलन लढायला मागेपुढे पाहणार नाही. हा आणि असा माझा दृढसंकल्प आहे…..!
तुमचा…….?



