Home देशविदेश दि.५ जून २०२६ ला असलेल्या “जागतिक पर्यावरण दिना”निमित्त कविता…

दि.५ जून २०२६ ला असलेल्या “जागतिक पर्यावरण दिना”निमित्त कविता…

 वाचवू पर्यावरण

     फुलू द्या रे उद्याचे नंदनवन ।

बंद करा पर्यावरणाशी खेळ ॥

प्राणवायू सिलेंडर पाठीवर ।

घेण्याची येऊ देऊ नका रे वेळ ॥

     झरेही आटले,नद्याही सुकल्या ।

बदलली येथे ही सृष्टीची रीत ॥

वृक्षाचा दातृत्वाचा स्मरावा गुण ।

वृद्धिंगत करू निसर्गाशी प्रीत ॥

     जीवन नि वाचवू पर्यावरण । 

वृक्ष लागवडीचा धरू ध्यास ॥

वृक्ष संवर्धन करू या सर्वच ।

लाभे मानवा निसर्ग सहवास ॥

     वृक्षारोपण करू झाडे जगवू ।

हिरवा शालू या धरेला पांघरू ॥

उद्याचे जीवन सुंदर बनवू ।

पर्यावरण दिन साजरा करू ॥

संत कबीर कवीराज पुररकार प्राप्त

             कवी

      प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले

          अमरावती.८०८७७४८६०९