Home Maharashtra एसटी बसचा अपघात,तिघांचा मृत्यू,अनेक जखमी….

एसटी बसचा अपघात,तिघांचा मृत्यू,अनेक जखमी….

राजेंद्र रामटेके

 विशेष प्रतिनिधी

       गडचिरोलीवरुन उमरखेडकडे जाणाऱ्या एसटी बसला नवेगाव–मुरखळा परिसरात झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे.

        मृत प्रवाशांना एसटी बस असिस्टंट यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

         अपघाताची माहिती मिळताच एसटी बस असिस्टंट हे तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. 

         या भीषण अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले असून,रुग्णालयातील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

         सर्व जखमींना वेळेवर,योग्य व आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रशासनासह आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत.जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत,अशी सदिच्छा एसटी महामंडळाच्या असिस्टंट कडून व्यक्त करण्यात आली आहे.