जिथे शोषण आहे तिथे स्पर्धा आहे.जिथे स्पर्धा आहे तिथे अन्याय आहे.शोधण्यासाठी स्पर्धा,स्पर्धेसाठी अन्याय असे हे सूत्र आहे.
जिथे शोषण,शोषणाची स्पर्धा,शोषणाची शिकवण,स्पर्धेची शिकवण,अन्यायाची भलावण म्हणजे पाठराखण तिथे विषमता असते,नव्हे निर्माण होते,समतेचा स्वातंत्र्याचा बंधुतेचा अंत असतो.
शोषण हे प्रत्येक क्षेत्रात असते.उदा.आर्थिक शोषण,सामाजिक शोषण,राजकीय शोषण,धार्मिक शोषण,सांस्कृतिक शोषण.
1) आर्थिक शोषण…..
नफा,व्याज,श्रमाची चोरी,पैशाची धनसंपतीची चोरी,साठेबाजी,काळाबाजार,भ्रष्टाचार,धोकाधाडी,फसवणूक,करार मोडणे,एखाद्याची जमीन, प्लॉट,घर दादागिरी करून हस्तगत करणे,नैसर्गिक साधन संपत्तीचे केंद्रीकरण,पैसा,सोने,धातू चे केंद्रीकरण करणे,सार्वजनिक सत्ता संपती प्रतिष्ठा याचा दुरुपयोग किंवा गैरवापर करणे,विविध मार्गाने प्रत्येक क्षेत्रात घुसून भ्रष्टाचार करून अनेक प्लॉट्स,अनेक बंगले,अनेक गाड्या,स्वतःचे हेलिकॉप्टर,विमान ठेवणे,अनेक कारखाने देशात विदेशात काढणे इत्यादी अनेक गोष्टी म्हणजे शोषण करणे होय.हे आर्थिक शोषण होय.
आर्थिक शोषण केल्याशिवाय खाजगी बँका काढल्याशिवाय त्यातून माया जमविल्या शिवाय माणूस श्रीमंत होत नाही.जर समाजा कुणी जन्मतःच श्रीमंत घराण्यात,जमीनदार,भांडवलदार,राजेरजवाडे यांचे कुटुंबात जन्म घेतला असेल,म्हणजे त्यास कसलीही पिळवणूक शोषण न करता आपोआप श्रीमंती त्यास मिळाली असेल,तरी त्याच्या कुटुंबातील त्याच्या बापाने किंवा आजोबाने,पंजोबाने शोषण करूनच ती संपती मिळवलेली असते,कींव जो शोषण करून मिळवतो,अन्याय अत्याचार करून सैन्यबळावर राज्य कमावतो,गुंडगिरीवर संपती कमावतो आणि आपल्यासाठी जो कुणी बहादुरी करतो,त्यास देशमुखी,सरदारकी,पाटीलकी, कुलकर्णी,चौधरी,बिरादरी,इत्यादी जहागिरी देऊन त्यास मालक बनवितो.
मालक म्हणजे संपत्तीचा हक्कदार,जमिनीचा,कारखान्याचा,बँकेचा हक्कदार म्हणजे मालक.ऐतखाऊ म्हणजे मालक,कष्टकरी म्हणजे श्रमिक,गुलाम,कामगार,कर्मचरी जे स्वतःचे श्रम किंवा बुद्धी विकतात आणि आपला संसार चालवतात असे सारेच गुलाम!.
अर्थात मालक आणि मजदुर,मालक आणि गुलाम असा आर्थिक वर्ग जिथे असतो,ती समाज व्यवस्था म्हणजेच शोषणावर आधारित समाज व्यवस्था होय.
अशा व्यवस्थेत भिकारी,दरिद्री,गरीब,मध्यम,उच्च माध्यम,श्रीमंत,उच्च श्रीमंत,गर्भ श्रीमंत,जमीनदार,उद्योगपती,सेलिब्रिटी,असे आर्थिक स्तर असतात.म्हणजे वर्ग असतात.पायऱ्या असतात.वरच्या पायरीचे स्थान वरच,आणि खालच्या पायरीचे स्थान खालीच असते.
म्हणजे वरच्यास प्रतिष्ठा सत्ता मिळते,खालचा वर्ग सत्ता,संपती प्रतिष्ठेवाचून वंचित ( दूर ) असतो.खालचा वर्गाचा आदर्श हा वरचा वर्ग असतो,म्हणून त्याचे अनुकरण करत असतो.म्हणजेच तो पण आपापल्या परीने शोषण करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो.नव्हे श्रीमंत होण्याची जणू स्पर्धाच असते,आणि शोषण करून कसे श्रीमंत व्हावे ? स्पर्धा कशी करावी ? ती कशी जिंकावी याचे शिक्षण हे शिक्षण डिपार्टमेंट आणि खेळाचे मंत्रालय देत असते.स्पर्धा आयोजित करून.परीक्षा स्पर्धा घेऊन.
२) सामाजिक क्षेत्र…..
यातही शोषण,स्पर्धा,अन्याय असतोच.या क्षेत्रातही जातीचे स्तर असतात.6500 जातीच्या पायऱ्या ( सामाजिक वर्ग,सामाजिक ग्रुप समूह ) आहेत.उतरंड आहे.मजल्यांची इमारत आहे.जातीच्या या पायऱ्या,मजले,उतरंड म्हणजेच सामाजिक विषमता होय.
या व्यवस्थेत भेदभाव,स्पृश्य अस्पृश्यता,शिक्षण आरोग्य समितीतील विषमता आहे.खालच्या जातीला प्रतिष्ठा नसते,समान संधी नसते.समान दर्जा नसतो,खालच्या जातींचे श्रमिक असतात.या जातींची आर्थिक पिळवणून होते.
अन्याय अत्याचार हे वरच्या जातीचे खालच्या जातीवर करीत असतात.स्वतःच्या जातीला श्रेष्ठ आणि खालच्या जातीला कनिष्ठ मानतात.याचे कारण ‘ वर्षभेद आणि वंशवाद ‘ हे होय.
स्त्री पुरुष भेदभाव म्हणजे लिंगभेद हा प्रत्येक जातीत असतोच,या भेदामुळे स्त्रीचे शोषण,तिच्यावर अन्याय,अत्याचार ,तिच्याशी भ्रष्ट व्यवहार हा प्रत्येक पुरुष ,प्रत्येक कुटुंबात करीत असतो.वर्चस्व गाजवतो.
कारण स्त्रीला निर्जीव वस्तू समजल्या जाते.मालमत्ता संपती समजल्या जाते.उपभोगाचे साधन समजल्या जाते.तिचा दर्जा पुरुषापेक्षा खालचा समजल्या जातो,या विषमतावादी शोषणकरी व्यवस्थेत.म्हणून लिंगभेदावर सारा समाज आज उभा आहे.त्यामुळे तिचे आर्थिक सांस्कृतिक शोषण चालू आहे.
3) धार्मिक शोषण……
देवाची भीती दाखवून,धर्माचे आचरण पद्धत,रूढी परंपरा निर्माण करून देव आणि धर्माच्या नावाने आर्थिक शोषण आणि श्रमाचे शोषण चालू आहे.स्वातंत्र्याचे आकुंचन होत आहे.समान संधी आणि समान दर्जा या सामाजिक न्यायाचा बट्ट्याबोळ होत आहे.हे एक प्रकारचे शिषणच होय.
4) सांस्कृतिक शोषण……
कुणी काय खावे ? कोणते कपडे वापरावेत ? पोशाख कोणता असावा ? कुणी कोणत्या देवाची आराधना करावी ? कोणता धर्म बाळगावा,किंवा स्वीकारावा किंवा नजरावा ? कुणी कसल्या घरात असावे ? लग्न करावे की नाही ? कुणी कोणत्या गल्लीत,मुहल्यात घर घ्यावे ? किंवा न मिळावे ? असे कितीतरी धार्मिक बंधने,याचा अर्थ माणसाच्या राहणीमान यावर समाजाचे बंधन असणे,म्हणजेच सांस्कृतिक शोषण होय.माणसाचे सांस्कृतिक स्वातंत्र्य,बंधुभाव हिरावून घेणे होय.
5) राजकीय शोषण……
वंचित आणि दलित,मागासवर्गीय समाजाला,जातीच्या माणसाला सत्ता नाकारणे म्हणजे एक प्रकारचे राजकीय शोषण च होय.आरक्षण देऊन त्यास सत्तेत हिस्सा देणे म्हणजे गुलामगिरी च होय.एकीकडे खालची वरची जात अशी व्यवस्था निर्माण करायची,गरीब श्रीमंत असे वर्ग निर्माण करायचे,धर्म मजबूत करायचे,जाती मजबूत करायच्या,वर्ग मजबूत करायचे त्यांच्यात स्पर्धा लावायचे,भांडणे लावायची.
सबल आणि दुर्बलाची स्पर्धा लावायची आणि त्यात आपणच ( म्हणजे सबलानीच ) जिंकायचे. हे षडयंत्र.या विषमतावादी व्यवस्थेचे असते,आहे.
यातून दुर्बलांना संधी देऊन सबळाच्या पंक्तीत आणण्याचे या नावाखाली ‘ सामाजिक न्याय ‘ म्हणून आरक्षण द्यायचे.त्यांना सत्तेचे संपत्तीचे,भांडवलदार जमीनदारांचे गुलाम म्हणून कायम ठेवायचे.हा कसला न्याय ? ही कसली समता ? हा कसला बंधुभाव ? हे कसले स्वातंत्र्य ? ही तर एक प्रकारची शोषण पद्धतच होय,ज्यातून गुलामी निर्माण होते,ती पद्धत म्हणजे शोषण होय.
सत्तेची गुलामगिरी म्हणजे मालक होणे नव्हे,तर नोकर होऊन राहणे होय.नोकर कर्मचारी म्हणजे ‘ सांगकाम्या ‘ च होय.म्हणूनच हे राजकीय शोषण होय.
मानवी जीवनाची आर्थिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक अशी पाच अंगे आहेत.या सर्वच अंगानी माणसाचे शोषण केल्या जाते.कारण शोषण का री आणि दमनकारी,अन्याय अत्याचार करणारी व्यवस्था म्हणजे विषमतावादी व्यवस्था असते.
ही व्यवस्था उलथून पाडून त्या ठिकाणी समतेवर आधारित समाजव्यवस्था आणल्या शिवाय शोषण,स्पर्धा,अन्याय नष्ट होणार नाहीत.हे चालूच राहणार आहेत.कितीही आंदोलने करा,उपयोग नाही.शेवटचे जबरदस्त आंदोलन करावे लागेल,ते म्हणजे ‘ क्रांती जिंदाबाद….. ‘



