Home देशविदेश आज भारतात विचारवंतांची कमी नाही… — पण आचारवंताचं ‘ बी ‘...

आज भारतात विचारवंतांची कमी नाही… — पण आचारवंताचं ‘ बी ‘ सुद्धा नाही.म्हणून भारत जगाच्या तुलनेत बँकफूटवर…

        या देशात एकविसाव्या शतकात प्रत्येक महापुरुष आणि महानायिका मग ते म.फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,म.गांधी,छ.शिवाजी महाराज,छ.शाहू महाराज,संत गाडगेबाबा,माता रमाई,माता जिजाऊ,माता सावित्री इत्यादी अशा कितीतरी क्रांतिकारक महानायक व महानायिका यांच्या क्रांतीचे सोंगे काढून एकपात्री,बहुपात्री नाटके करून पैसे कमविण्याचे,त्यांच्या क्रांतीचे भांडवल करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी एक फॅशनच सुरुवात झाली.

        ज्या क्रांतिकारकाने साधे पाणि मिळविण्यासाठी त्यांचे अंगण झाडावे,शिळेपाके खाण्यासाठी त्यांची लाकडे फोडावी,चावडीसमोरील घाण साफ करून रात्री कीर्तन करून,”विज्ञानवादी प्रतिभा, रुजविण्यासाठी अंधश्रद्धा कायमची लाथाडण्यासाठी त्यांनाच बोलतं करावं. 

         आणि शेवटी या समाजसेवच्या बदल्यात काय तर केवळ,”भाकरी आणि पिठलं,अशा महान क्रांतिकारकांनी तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन जीवनभर भटकंती करावी. 

        शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणानंतर अन्नपाण्याचा त्याग करून आपला देह त्यागावा!

         म.फुलेंच्या महापरिनिर्वाणानंतर आमच्या सावित्रीबाई फुलेनी प्लेगच्या साथीतच रुग्णसेवा देतानाच देहत्याग करावा!

      आपल्या बॅरिस्टर पतीकडे एक पत्नी म्हणून कोणताही सांसारिक हट्ट किंवा तक्रार न करता परदेशात शिक्षण घेत असताना स्वतःच्या मुलांचे संगोपन करता करताच आपले सर्वस्व पणाला लावून प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे आपल्या पतीच्या क्रांतीला मोठे पाठबळ देणाऱ्या माता रमाई!

     शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावायचा नाही,असा सक्त आदेश देणारे छ.शिवाजी महाराज!

        गंगाराम कांबळे सारख्या मातंग अस्पृश्य बांधवाला जगण्यासाठी,स्वावलंबी बनविण्यासाठ,हॉटेल टाकण्यासाठी सर्व मदत करणारे छ.शाहू महाराज!

      THE SYMBOL OF KNOWLEDGE म्हणून अमेरिकेने गौरविलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत!

        या अशा कितीतरी वरील क्रांतिकारी महानायक आणि महानायिका यांच्या क्रांतीची एकपात्री व बहुपात्री नाटके करून,”पैसे आणि प्रसिद्धी, मिळविण्याची,”फॅशन,का सुरुवात झाली (जे कोणतेही मानधन न घेता हे प्रयोग करतात त्यांना सॅल्यूट…?

        याचा अर्थच हा आहे की,”आम्ही भारताचे लोकं,म्हणून प्रत्येकजण स्वतःला महापुरुष समजतो.माझ्याएवढे कुणालाही काहीही माहिती नाही,मी जे करतो तेच बरोबर आहे,अशा अविर्भावी अहंकारात देश बुडाल्याने प्रत्येकजण विचारवंत झाला,परंतू आचारवंत होऊ शकला नाही. 

      म्हणून आमच्या भारतात जगाच्या तुलनेत एक ग्रीक देश जर सोडला तर सर्वात जास्त,” महापुरुष,महानयिका,तत्ववेत्त्यांची खाण असताना सुद्धा या देशात,साम,दाम,दंड आणि भेदाची कुटनीतीच वरचढ ठरते.याचे एकमेव कारण हेच की या देशात…….

         आज विचारवंतांची कमी नाही पण आचारवंताचं ‘ बी ‘ सुद्धा नाही.निदान एक बी असतं तर ते आम्ही जमिनीत पुरून त्याला खतपाणि घातलं असतं आणि उद्या त्याच झाडाला फळं लागली असती!…

        हे या देशाचे गेल्या 75 वर्षातील अपयश आहे.त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ RSS / मनुवादी विचारसरणी आहे.

             लेखक

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…