Home Maharashtra उत्तम व्यक्तीत्व असलेल्या आ.प्रितम जनबंधु,(शिक्षक) सरांचा मंगल परिणय सोहळा संपन्न होणार १५...

उत्तम व्यक्तीत्व असलेल्या आ.प्रितम जनबंधु,(शिक्षक) सरांचा मंगल परिणय सोहळा संपन्न होणार १५ में ला…‌ — एक सद्विवेकी चारित्र्यसंपन्न सहकारी मित्र अडकणार अभेद सांसारिक जीवनात!…

       आ.प्रितम महानंदा देवाजी जनबंधु हे चिरपरिचित व्यक्तीमत्व!,”प्रितम सर मृदू भाषी असून ते अतिशय प्रेमळ व शांत स्वभावाचे सद्गृहस्थ आहेत.तद्वतच ते संयमी आणि कर्तव्यदक्ष आहेत.

       पत्रकार ते शिक्षक असा त्यांचा जिवन प्रवास आहे.जनसामान्यांचा बुलंद आवाज असलेल्या,”दखल न्यूज भारत वेब पोर्टल चे अत्यंत प्रतिष्ठित,निर्भीड पत्रकार,संपादक होते.आजही पत्रकारीता क्षेत्रासी ते जुळून आहेत.पण सध्या त्यानी शिक्षकी पेशात स्वत:ला समर्पीत केले आहे.उत्तम विद्यार्थी घडविणे हे त्यांचे कर्म बनले आहे.म्हणूनच ते एक उत्तम शिक्षक म्हणून पुढे आले आहेत.

          पत्रकारिता अंतर्गत शोषित,वंचित आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 

           प्रतिकुल परिस्थितीत स्वत:शी संघर्ष करताना त्यांनी आपल्या यशाचे गमक कधीच सार्वजनिक केले नाही.त्यांनी स्वतःला घडविताना मैत्रीभाव,शांत स्वभाव,आणि समजदारपणा कधीच ढळू दिला नाही.

       शोषित आणि वंचित वर्गावर केंद्रित आणि परखड लेखनासाठी ते प्रसिद्ध होते.पत्रकारितेसोबतच ते एक प्रगल्भ विचारवंत आणि आदर्श व्यक्तिमत्व आहेत हे विशेषतः नमूद करतो आहे.

        आपली जबाबदारी किंवा काम अत्यंत काळजीपूर्वक,प्रामाणिकपणे,शिस्तबद्ध पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे.कामाप्रती अत्यंत समर्पित असल्याने त्यांचा प्रभाव हा नेहमीच कर्तव्याला उजाळा देणारा आहे.

        दिलेले काम गांभीर्याने घेणे आणि ते पूर्ण करण्याची तयारी असणारे प्रितम जनबंधु सर म्हणजे शिस्त आहेत.पद्धतशीर,नीटनेटके आणि नियोजित पद्धतीने काम पार पाडणे हा त्यांचा कार्यभाग!

      ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची वृत्ती त्यांच्यात असल्याने ते स्वतःचे कर्तव्य निष्ठेने बजावतात,म्हणूनच ते ‘कर्तव्यदक्ष’ आहेत.

      आ.प्रितम जनबंधु सरांसारखी चांगली किंवा ‘योग्य’ व्यक्ती केवळ त्यांच्या पदवीने ओळखली जात नाही,तर त्यांचे वर्तन,चारित्र्य आणि विचारसरणी यावरून त्यांची पारख केली जाते.आ.प्रितम सरांमध्ये सचोटी,विश्वासार्हता आणि उच्च नैतिक मूल्ये आहेत हे स्पष्ट करतो आहे.

        यशस्वी झाल्यानंतरही ज्या व्यक्तीमध्ये अहंकार नसतो आणि जी सर्वांशी नम्रतेने वागते,ती योग्य व्यक्ती असते.स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारी आणि संकटातही जिद्द न सोडणारी व्यक्ती म्हणजे आ.प्रितम जनबंधु सर होत.

       दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेण्याची आणि मदत करण्याची भावना त्यांच्यात आहे.कठीण प्रसंगातही सकारात्मक राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुध्दा त्यांच्यात आहे.

      सहाजिकच आहे आईवडीलांनी त्यांच्यात योग्य संस्कार रुजवली!”भावनिक आणि मानसिक स्थित्यंतरे,मजबूत करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना प्रेरणा दिली!..

        जी व्यक्ती समाजासाठी,कुटुंबासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी सकारात्मक काम करते आणि जिच्या वागण्यात माणुसकी दिसते,ती व्यक्ती ‘योग्य’ मानली जाते.”असेच प्रितम जनबंधु सर!

    अशा या प्रिय सहकारी मित्रांचा,”मंगल परिणाम सोहळा,येत्या १५ में २०२६ ला गडचिरोली येथे दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे.

      आ.प्रितम जनबंधु सर हे आ.मंजुषा नंदाताई दत्तात्रय कांबळे,(शिक्षिका) यांच्या सोबत मंगल परिणयबद्ध होणार आहेत.

      आ.प्रितम महानंदा देवाजी जनबंधु + आ.मंजुषा नंदाताई दत्तात्रय कांबळे यांचा मंगल परिणय सोहळा आप्त परिवार,मित्र परिवार,नातेवाईक यांच्या साक्षीने दिनांक १५ में २०२६ ला दुपारी साडेबारा वाजता संपन्न होणार आहे.

         त्यांच्या भावी,उज्ज्वल,सुखी,समाधानी,समृध्द,निरोगी,आनंदी आयुष्यासाठी खूप खूप मंगल कामना!

           शब्दांकन

            प्रदीप रामटेके

“मुख्य संपादक,–“दखल न्यूज भारत वेब पोर्टल….