Home Social कुरखेडा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण, संकल्प फाऊंडेशन चे डॉ.जगदीश बोरकर यांचा पुढाकार…

कुरखेडा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण, संकल्प फाऊंडेशन चे डॉ.जगदीश बोरकर यांचा पुढाकार…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        कुरखेडा येथे संकल्प फाऊंडेशनच्या पुढाकारातून नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

        या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ,यांचे सह भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,रविंद्र गोटेफोडे,प्रा. दशरथ आदे सर आरोग्य सभापति सागर निरंकारि यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी संचालक जिडिसिसि बैंक वसंतराव मेश्राम, लोकमत चे तालुका प्रतिनिधी सिराज पठाण ,विवेक निरंकारि,प्रा.विनोद नागपूरकर,मोनेश मेश्राम,सोनू रहांगड़ाले,सामजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण,उल्हास देशमुख,लक्ष्मण धुळसे यांच्यासह अनेक मान्यवर व फाऊंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

       संकल्प फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल असे गौरवोद्गार रविंद्र भोसले यांनी काढले.डॉ जगदीश बोरकर यांचे संकल्पतेतुन संकल्प फाऊंडेशन च्या पुढाकारतूण रुग्णवाहिकच ऊपयोग जनसामान्यां ना होणार असून नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.