राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कुरखेडा शहरात काही वर्षांपूर्वी नगर पंचायत प्रशासनाकडून स्ट्रीट पोलवर स्वामी विवेकानंद व ईतर महान स्वातंत्र सेनानि यांचे फोटो असलेले लाईट बॉक्स लावण्यात आले होते.
मात्र सध्या हे बॉक्स तुटलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे शासनाच्या निधीचा अक्षरशः चुराडा होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सध्या महामार्गाचे काम सुरु आहे,त्यामूळे जूने इलेक्ट्रिक खांब हटविण्याचे कार्य सुरु आहे.परंतु या जुन्या पोलला लागलेले लाईट बॉक्स व ईतर साहित्य,तुटलेले लोखंडी फ्रेम,खराब झालेले लाईट बॉक्स आणि अस्ताव्यस्त पडलेले साहित्य रस्त्याच्याकडेला आढळून आले.
यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सार्वजनिक ठिकाणी अशा अवस्थेत साहित्य पडून असल्याने अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.
नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित साहित्य तातडीने हटवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच भविष्यात शासनाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या योजनांची योग्य देखभाल करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



