राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
गाव बोलीभाषेत लिहिलेल्या कवितांचा सन्मान आधी गावातच व्हावा आणि समाजात तिची दूरवर ओळख व्हावी या उद्देशाने मूळ गाव देऊळगाव येथील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक,सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी झाडीबोली भाषेत लिहिलेल्या “झाडीचा खाजा” या झाडीबोली काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन दि.१७ में २०२६ रोज रविवारला,” महादेवगड अरततोंडी येथील,गट ग्रामपंचायतच्या सभागृहात सकाळी ११ वाजता केले आहे.
कार्यक्रम दोन सत्रात होणार असुन पहिल्या सत्रात “झाडिचा खाजा “या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याला उद्घाटक म्हणून नाट्यलेखक,नाट्यकलावंत,दिग्दर्शक सदानंद बोरकर,अध्यक्ष विजय तुलावी प्रशासक गट ग्रामपंचायत अरततोंडी,दीपप्रज्वलन प्रसिद्ध साहित्यिक,आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम गडचिरोली,भाष्यकार डॉ.धनराज खानोलकर ३३ व्या झाडीबोली संमेलनाचे अध्यक्ष काटली,भाष्यकार समीक्षक,नाट्यकलावंत प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी,विशेष अतिथी म्हणून वासुदेव कोल्हे ग्रामकोष समीती अध्यक्ष देऊळगाव,ग्रंथमित्र भाऊराव पत्रे प्रमुख कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ नागपूर, व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ ला कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.”कविसंमेलनाध्यक्ष” जेष्ठ हास्य कवी एकनाथ बुध्दे विसोरा हे उपस्थित राहणार आहेत.
सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत “झाडीचा खाजा” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या इच्छूक कवींनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा ७८२१८१६४८५ असे या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक साहित्यिक,सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल व आयोजकानी केले आहे.



