राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कुरखेडा बाजार वाडीत सध्या वास्तवास असलेली जांभुळघाट येथील सोनू अजय गेरेवार (वय २५) या विवाहित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
प्रकृती गंभीर असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर येथून पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून,या घटने ची परिसरात विविध चर्चाणा उधाण आले आहे.संबंधित प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केल्याचे कळते व पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते.


