राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज संस्था म्हणुन प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहीत करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीची पुरस्कारा करीता तालुकास्तरीय तपासणी समितीकडून ग्रामपंचायत गेवर्धाची तपासणी करण्यासाठी पंचायत समिती कळंब जि. प. यवतमाळ येथील मुल्यमापन समितीने ग्रामपंचायत कार्यालय गेवर्धा या ठिकाणी भेट देऊन ग्रा.पं.प्रशासन आणि विविध विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
ग्रामपंचायत तपासणी करण्याकरिता मुल्यमापन तपासणी अधिकारी श्री. भूपेंद्र बाहेकर गटविकास अधिकारी पं. स. कळंब जि. यवतमाळ,श्री.अमोल वरवे गटशिक्षणाधिकारी पं. स. कळंब,श्री. मारोती वायगोकर विस्तार अधिकारी ( पंचायत ) पं. स. कळंब यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सौ. सुषमा मडावी हे होते.
याप्रसंगी श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे शिक्षण घेत असलेला गावातील युवक प्रथमेश कैलास मैंद याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वर्ग 12 (कला ) शाखेत 85 टक्के गुण संपादण करून गडचिरोली जिल्यातुन दुसरा क्रमांक आणि कुरखेडा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.पदाधिकारी, ग्रामकोष समिती पदाधिकारी, तंटामुक्त समिती पदाधिकारी, सामूहिक वन वनहक्क ग्रामसभा पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती ,अंगणवाडी सेविका, महिला ग्रामसंघ,महिला बचत गटाचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ग्रा.पं.कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री.देवानंद भोयर यांनी तर आभारप्रदर्शन प्रशासक समिती सदस्य रोशन सय्यद यांनी केले.



