Home Maharashtra महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात ध्वजारोहण, आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते कार्यक्रम उत्साहात...

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात ध्वजारोहण, आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते कार्यक्रम उत्साहात संपन्न…

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          दि.१ मे – महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय चिमूर, येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या गीताने करण्यात आली. त्यानंतर आमदार महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी एकमुखाने जन गण मन राष्ट्रगीत सादर करून राष्ट्राभिमान व्यक्त केला.पुढे महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.“महाराष्ट्र दिन चिरायू होवो” तसेच “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला.

             यानंतर आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, दहा दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिर (स्थळ — शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, जांभूळघाट) यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांची प्रदर्शनी पाहण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व कलाकौशल्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

        कार्यक्रमादरम्यान जनगणना अभियानाच्या अनुषंगाने उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा व शासनाच्या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

             या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर – डॉ. संतोष एम. थिटे साहेब,उपविभागीय पोलीस अधीक्षक ठोसरे साहेब,चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने चिमुरचे ठाणेदार दिनेश लबडे चिमूर नगर परिषदेचे अध्यक्षा गीता ताई लिंगायत,उपाध्यक्ष संजय नवघडे, भाजपा राज्य परिषद सदस्य राजूभाऊ देवतळे, भाजपा तालुका समन्वयक राजू पाटील झाडे, संचालक महाराष्ट्र राज्य बाजार समिती सह. संघ मर्यादित पुणे घनश्याम भाऊ डुकरे, भिसी नेरी शंकरपूर मंडळ अध्यक्ष मनिष तुम्पल्लीवर,चिमूर नगर परिषदेचे माननीय सर्व नगरसेवक गण,बंटी वनकर,अमित जुमडे,पप्पू भाई शेख,प्रकाश वाकडे, प्रशांत चिडे,स्कॉट गाईड टीम व बोरकर सर विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.