Home Maharashtra कुरखेडा पोलिस स्टेशन करिता अभिमानास्पद क्षण, पोलीस निरीक्षक महेंद्र बाबुराव वाघ यांना...

कुरखेडा पोलिस स्टेशन करिता अभिमानास्पद क्षण, पोलीस निरीक्षक महेंद्र बाबुराव वाघ यांना डीजी पदक…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यदक्षता, धाडस आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस निरीक्षक महेंद्र बाबुराव वाघ यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DG) पदक प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानामुळे जिल्ह्यात पोलीस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        महेंद्र वाघ यांनी गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि आव्हानात्मक कूरखेडा पोलिस स्टेशन येथे कार्य करताना धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नक्षलविरोधी मोहिमांमध्ये मोठे यश मिळाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

       “कर्तव्य हीच ओळख, सेवा हीच प्रेरणा” या तत्त्वावर कार्य करत त्यांनी अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना डीजी पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

        या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.