शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भारत सरकारने 2027 मध्ये जनगणना करण्यासाठी जनगणना कार्यक्रम घोषित केलेला आहे.त्या अनुषंगाने पर्यवेक्षक आणि प्रगणक यांचे प्रशिक्षण सुरू आहे. जनगणनेच्या पहिल्या फेरीतील प्रशिक्षणामध्ये असे सांगण्यात आले आहे. की ही जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि यासाठी HLO ॲप डाऊनलोड करायचा आहे.
मात्र अनेक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये सदर वर्जन 12 आणि चार जीबी रॅम उपलब्ध नाही. त्याच्यामुळे पर्यवेक्षक आणि प्रगणक यांना या ॲप्समध्ये जनगणना कशी करायची हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
HLO हा ॲप्स डाउनलोड करायचा असेल तर १२ वर्जनचा भ्रमणध्वनी खरेदी करण्याकरिता वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयांचा भूर्दंड कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे शासनाने पर्यवेक्षक आणि प्रगणक यांना मोबाईल पुरवावे या आशयाचे निवेदन चिमूर येथील पर्यवेक्षक आणि प्रगणक यांनी तहसीलदार यांना दिले.
निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे की 2027 च्या जनगणनेकरिता सर्व पर्यवेक्षक आणि प्रगणकांना सदर रॅमचा आणि वर्जनचा मोबाईल उपलब्ध करून द्यावा जेणेकरून जनगणनेचे काम सुरळीत पार पडेल आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी जनगणनेच्या कामात राहणार नाही.
जनगणना 2027 करिता वर्जन 12 आणि फोर जीबी रॅम चे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन देताना सुरेश डांगे, हरी मेश्राम,ताराचंद रामटेके,कैलाश बोरकर,गजानन सातपुते,रविंद्र चिडे, शिवाजी मेटकरी उपस्थित होते.



