शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत येणाऱ्या मौजा सातारा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीला अनुसरून,”ग्राम जयंती,उत्सव आनंदमय वातावरणात संपन्न झालाय.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस हा संपूर्ण एप्रिल महिन्यात,”ग्राम जयंती,म्हणून साजरा केला जातो.
ग्राम जयंती निमित्ताने गावाचा विकास,अंधश्रद्धा निर्मूलन,समाज प्रबोधन,ग्रामगीता वाचन सारख्या क्रांतिकारी विचाराचे स्मरण केले जाते आणिराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रसार प्रचार केला जातो.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंती निमित्ताने प्रबोधन प्रचार यात्रा व सामुदायिक प्रार्थना चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक संदेशासह संपन्न संपन्न झाली..
प्रबोधन प्रचार यात्रेचा उदेश (प्रभात फेरी) तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतातंर्गत आणि कार्याला अनुसरून विचार,स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि ग्रामविकासाचा संदेश घराघरात पोहोचवणे असतो.
मौजा सातारा येथील यात्रे मध्ये ग्रामस्थ,महिला, युवक आणि लहान मुले पारंपरिक हातात खंजिरी,टाळ घेऊन ग्रामगीता आणि राष्ट्रसंतांची भजने गात सहभागी झाले होते.
गाव जागृती अन्वये गावाच्या मुख्य मार्गावरुन यात्रा काढून ग्रामस्वच्छता आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
यात्रेच्या समारोपानंतर गावाची एकात्मता वाढवण्यासाठी सामुदायिक प्रार्थना (सर्वधर्म प्रार्थना) आयोजित करण्यात आली.यात ग्रामगीता वाचन,आणि ध्यानाचा समावेश होता.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांद्वारे (खंजिरी भजन) व्यसनमुक्ती,ग्रामस्वच्छता आणि सामाजिक सुधारणांवर प्रबोधन करण्यात आले.संघटनात्मक शक्तीवर भर दिला गेला.या कार्यक्रमामुळे ‘ग्रामविकास’ हाच ‘राष्ट्रविकास’आहे,या विचाराला बळ मिळाले आहे.
राष्ट्रीय एकात्मते करिता देशातील तरुणांनी एकत्र येऊन राष्ट्रनिर्माणाचे कार्य करावे याकरिता आव्हान करण्यात आले.
या ग्राम जयंती उत्सव कार्यक्रमाला राजूभाऊ देवतळे गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,चरडे गुरुजी विदर्भ प्रांत सेवाधिकारी,प्रा.राम राऊत तालुका सेवाधिकारी,श्री.भोयर तालुका सेवाधिकारी, श्री.गजानन गुळधे प्रशासक सरपंच ग्रा.पं.सातारा,अनेक मान्यवर कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित होते.
ग्राम जयंती उत्सव कार्यक्रमाला गुरुदेव सेवक व सातारा ग्रामवासी उपस्थित होते.



