Home Maharashtra प्रगणक,पर्यवेक्षकांना जनगणनेसाठी प्रशिक्षण…

प्रगणक,पर्यवेक्षकांना जनगणनेसाठी प्रशिक्षण…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी : आगामी जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद, आरमोरी क्षेत्रातील प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण सर्व चिकित्सालय पशुवैद्यकीय दवाखाना सभागृह आरमोरी येथे दिनांक २३ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडले आहे. तर दुसऱ्या बँच चे प्रशिक्षण दिनांक 27 ते 29 एप्रिल 2026 दरम्यान पार पडणार आहे.

       या प्रशिक्षणात 47 प्रगणक व 8 पर्यवेक्षकांना जनगणनेची कार्यपद्धती, माहिती संकलनाची अचूक पद्धत तसेच आधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

        सदर प्रशिक्षण कार्यक्रम नगरपरिषद आरमोरीचे मुख्याधिकारी प्रीतीश मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. तसेच क्षेत्र प्रशिक्षक म्हणून अविनाश मडावी व आशिष हेमके हे प्रशिक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहेत.