राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा मंडळ अधिकारी कार्यालय येथे महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार राहुल पाटिल यांचे प्रमूख उपस्थितीत वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात कुरखेडा मंडळ परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कागदपत्र पुर्ण असलेल्या १५ शेतकर्यांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून फार्मर आयडी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली.
शिबिरात उपस्थित मंडळ अधिकारी नवले यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याची गरज आणि नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या उपक्रमामुळे वनपट्टा धारक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होणार असून प्रशासनाच्या या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी महसूल विभागाचे महसूल सेवक रविंद्र बोदेले सहमहसुल सेवक यांनी सहकार्य केले.



