राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
मौजा सोनसरी येथील नागरिकांनी,”माझा गाव आरोग्य संपन्न,गाव अभियान मध्ये सहभाग आज घेतला व संपूर्ण गावात योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचना नुसार ग्राम पातळीवर ग्रामसभा व समिती गठित करून गावामध्ये जनभागीदारी आरोग्य,स्वच्छता पर्यावरण स्वच्छता,प्रजनन व बाल आरोग्य,सर्गजन आजार,मानसिक आजार,आरोग्य सुधारणा,दुर्बल लोकांना आरोग्य सेवा,प्रतिबंधात्मक उपाययोजना,पाणी पुरवठा,महिला व बाल कल्याण,आरोग्य दायी जीवन शैली,निदान व उपचार,कीटकजन्य आजार व उपचार,पोषण आणि व्यायाम यातंर्गत उपचार सुविधा देण्यात आल्या.
संपूर्ण गावाच्या विकासासाठी,”माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा संकल्प सोनसरी येथे घेण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मिनाक्षीताई वाटी,उपाध्यक्ष श्री झुनुकलाल चौधरी,सचिव पुरुषोत्तम खजरे,समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ.मधू धरणे,पोलीस पाटील सुमित्रा वालदे,ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य व पशु वैद्यकीय अधिकारी,ग्राम आरोग्य पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष ममता गोटा,शिक्षक प्रतिनिधी श्री.Y.L.शेंडे,श्री.राजेंद्र रामटेके स्थानिक पत्रकार संघ प्रतिनिधी,आरोग्य सेवक डी.बी.बागडे,आरोग्य सेविका,अंगणवाडी कार्यकर्ती,अशा सेविका व सर्व ग्राम प्रतिनिधी उपस्थित होते.



