प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
“विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले!”
वरील वाक्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजन समाजाला,(ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याकांना,इतर मागासवर्गीय.) अनुसरून आहे…
राजेशाही व पारतंत्र्याच्या काळात मनुस्मृतीच्या कायद्याने व त्या कायद्यातंर्गत धर्मव्येवस्थेने,”जातीयतेला व विषमतेला महत्त्व देत,भारत देशातील समस्त स्त्रियांसाठी आणि बहुजन समाजातील पुरुषांसाठी शिक्षणाची दारे बंद केली होती.याचबरोबर अधिकारापासून वंचित केले होते.
तद्वतच,”भेदभावातंर्गत अनेक जातीत व पोटजातीत लोकांची विभागणी करुन माणसांना माणसापासून दूर करण्याचे काम,”द्वेषी,क्रुर,निच,कपटी,छडयंत्रकारी,अन्यायकारक,शोषणयुक्त,अत्याचारी,रुढी परंपरेला अनुसरून मनुस्मृतीच्या कायद्याने व त्यानुसार धर्मव्येवस्थेच्या ठेकेदारांनी केले होते,आजही सुरु आहे.
यामुळे भारत देशातील बहुजन महिला पुरुषांचे अनर्थ व वाटोळे मागील अडीच हजार वर्षांपासून मनुस्मृतीच्या कायद्यानुसार व ब्राम्हणी धर्मव्यवस्थेच्या धुर्त परंपरेनुसार उच्च वर्णीयाद्वारे करण्यात आले होते.
तद्वतच भारत देशातील समस्त स्त्रियांचे व बहुजन समाजातील ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक,इतर मागासवर्गीयाच्या,”पिढ्यानपिढ्या दर पिढ्यांना,शिक्षणाविना मानसिक गुलाम केले गेले होते.
याचबरोबर हुकूमशाही तत्वातंर्गत त्यांना मान हलविण्यापुरते आणि उच्चवर्णीय ब्राम्हणांच्या निर्देशांचे पालन करण्यापुरतेच,” भारत देशातील समस्त स्त्रियांना व बहुजन समाजातील पुरुषांना मर्यादित करुन ठेवले होते.तद्वतच समस्त स्त्रियांना व बहुजन समाजातील पुरुषांना अधिकारविहिन करुन त्यांना धनद्रव्यापासून वंचित केले होते.
यामुळेचे शिक्षणाचे महत्त्व ओळखून,”समस्त स्त्रियांसाठी व बहुजन समाजातील पुरुषांसाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरु केल्यात,वसतिगृहांची उभारणी करुन राहण्याची व्यवस्था केली,शिक्षणाची दारे सुरु केलीत.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पतीच्या म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ध्येयाला साकार करण्यासाठी स्वत: शिक्षिका बनून मुलींना व मुलांना शिक्षण देण्याचे अमुल्य कार्य सुरु केले,समाजात अमुलाग्रह बदल घडवून आणित शैक्षणिक क्रांती केली आणि उत्तम राष्ट्र उभारणीसाठी महान कार्य केले.
तद्वतच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी तर आपल्या राजेशाहीच्या,”राज्य काळात, बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली,विद्यार्थी मुलामुलींना शिक्षणस्थळी राहण्यासाठी वसतीगृहे निर्माण केलीत,नौकऱ्यांसाठी आरक्षण लागू केले,नौकऱ्या दिल्यात,भेदभाव कमी करण्यासाठी मोलाचे कार्य केले.
युगप्रवर्तक-महामानव,भारत देश निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीरपणे,”बहुजन मुलांसह समस्त मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडी केलीत,शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सुविधा बहाल केल्यात व प्राथमिक शिक्षण मुलभूत अधिकारात आणले.याच बरोबर सरकारी नौकऱ्यांची संधी सर्व स्त्रियांना व पुरुषांना उपलब्ध करून दिली.खासदार-आमदार व इतर लोकप्रतिनिधी बनन्याची कायदेशीर व्यवस्था केली,भारत देशातील सर्व स्त्रियांना व बहुजन समाजातील सर्व प्रोढ नागरिकांना मताधिकाराचा मुलभूत अधिकार दिला.धनसंचय करण्याचा अधिकार सर्वांना दिला.तद्वतच सर्वप्रकारचे अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत देशातील समस्त स्त्रियांना व पुरुषांना दिले.
याचबरोबर समता,स्वातंत्र्य,बंधुता न्याय,समानता,अभिव्यक्ती, सार्वभौमत्व या तत्वावावर भारताची उभारणी केली.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व विशद करताना म्हणतात,१) “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.२) आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे.३) तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पुर्णत्वाला जाणार नाही.
*****
शिक्षण महत्त्वाचे का म्हणून आहे….
👇👇
शिक्षण हे वैयक्तिक विकास,आत्म-विश्वास,आणि आर्थिक समृद्धीचा पाया आहे,जे माणसाला साक्षर,सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर बनवते.
शिक्षण केवळ नोकरीसाठी नाही,तर शिक्षण तर्कसंगत गंभीर विचार करायला लावत.शिक्षण हे समस्या निवारण्यासाठी आणि सामाजिक समानतेसाठी आवश्यक आहे.शिक्षण हे उज्ज्वल भविष्याचा पासपोर्ट आहे,जे नवीन संध्या निर्माण करते.
शिक्षणामुळे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास तर होतोच,पण शिक्षणामुळे व्यक्तीची विचारशक्ती विकसित होते,आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतात.
उच्च शिक्षणाने चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतात,ज्यामुळे गरीबी कमी होऊन आर्थिक सुरक्षा मिळते.शिक्षित समाज हा प्रगत असतो.शिक्षणामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते आणि नागरिक अधिक जबाबदार बनतात.
शिक्षणामुळे माणसाला निर्णय घेण्याची क्षमता आणि नवीन कल्पना शोधण्याची सृजनशीलता मिळते.
शिक्षण हक्कांची जाणीव करुन देतय,शिक्षणामुळे आपल्याला आपल्या हक्काची आणि जबाबदाऱ्यांची पूर्ण माहिती मिळते,ज्यामुळे आपण एक चांगला समाज घडवू शकतो.म्हणूनच शिक्षण हे मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करणारे एक शक्तिशाली साधन आहे.
शिक्षणाचे महत्त्व हे मानवी जीवनातील यशाची गुरुकिल्ली असून,ते व्यक्तिमत्त्व घडवणारे,आत्मविश्वास वाढवणारे आणि योग्य-अयोग्याची जाण देणारे प्रमुख साधन आहे.शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही,तर तार्किक विचारशक्ती विकसित करून गरिबी दूर करते आणि व्यक्तीला स्वावलंबी बनवते.
शिक्षणामुळे सामाजिक,आर्थिक विकास साधला जाऊन एक प्रगत राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते,म्हणूनच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,असे म्हटले जाते.
शिक्षण ही जीवनाची गुरुकिल्ली आहे.” निरोगी शरीरासाठी जसे अन्नाची गरज असते,तशीच मानवी जीवनाच्या विकासासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे.शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाऊन पुस्तके वाचणे किंवा पदवी मिळवणे नव्हे,तर ज्ञान मिळवून सुज्ञ नागरिक बनणे होय.शिक्षणामुळे योग्य निर्णयक्षमता येते आणि सुशिक्षित व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो.
शिक्षणामुळे समाजात अंधश्रद्धा कमी होतात आणि जागरूक नागरिक तयार होतात.एक सुशिक्षित समाजच राष्ट्राची प्रगती करू शकतो.
शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,ज्याचा वापर करून आपण जग बदलू शकतो.शिक्षण आपल्या स्वप्नांना पंख देते आणि यशाच्या शिखरावर पोहोचवते.म्हणून,आपण सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवला पाहिजे.म्हणूनच शिक्षण हे यशाचा मार्ग आहे.
शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया असून,व्यक्तिमत्त्व विकास करते,बौद्धिक क्षमता वाढवते आणि आर्थिक स्वावलंबनासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
शिक्षणामुळे माणसाला जबाबदारीची जाणीव होते,माणसाला सुसंस्कृत बनवते आणि माणसाला समाजात सन्मान मिळवून देते.आरोग्याबद्दल आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता शिक्षणामुळेच वाढते.
शिक्षण हे मानवाला पशुत्वाकडून मानवाकडे नेणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे माध्यम आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
शिक्षण म्हणजे काय तर चांगल्या गुणांचे संगोपन,ज्ञानप्राप्ती आणि प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त क्षमतांना वाव देण्याची प्रक्रिया.
शिक्षण मुलाच्या शारीरिक,नैतिक,सामाजिक,बौद्धिक,भावनिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विकास व वृद्धी करण्यास मदत करते.
*****
शिक्षक…..
👇👇
आपल्या ज्ञानाने व्यक्ती,समाज आणि राष्ट्र घडवणारा,असा तो शिक्षक असतो.शिक्षक हाच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास जागवतो,ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत येते.जे विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते.
ज्ञान हे मानवी जीवनातील सर्वात मोठे धन आणि शक्ती आहे,जे अज्ञानाचा अंधार दूर करून प्रगतीचा प्रकाश देते.
शिक्षण हे केवळ बौद्धिक संपत्ती नसून,यशाची गुरुकिल्ली आहे,ज्यामुळे व्यक्ती समाज आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देऊ शकते,म्हणूनच शिक्षकांचे महत्त्व राष्ट्र उभारणीत अनन्यसाधारण आहे.
*****
शाळा…
👇👇
शाळा म्हणजे केवळ निर्जिव भिंती नव्हेत तर राष्ट्र उभारणीचा जिवंत व मजबूत पाया आहेत.
खेड्यापाड्यातील शाळेच्या त्या भिंती खेड्यातील गोरगरीब जनतेला सांगतात,प्रेरणा देतात,” तु तुझ्या मुलाला शिक्षणाद्वारे लायक बनव,माणूस बनव,राष्ट्र उभारणीचा सहकारी बनव,स्वत:सह कुटुंबांचा,सामाजिक,शैक्षणिक,आर्थीक,राजकीय चळवळीचा आधार बनव,त्याला प्रेरणा बनव,त्याला लोकांचा खरा सोबती व मित्र बनव!
म्हणूनच प्राथमिक व माध्यमिक शाळा म्हणजे गोरगरीब जनतेचा व त्यांच्या मुलांचा सोबती,ज्ञानसाधना,प्रगतीचा प्रथम पाया!,
“यामुळे शाळा म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे,तर अनुभव,शिक्षण आणि कल्पकतेतून मिळवलेली समज होय.म्हणूनच म्हटले आहे की,ज्ञान हेच सर्वोच्च धन आहे.
*****
भाजपा सत्ताकाळात प्राथमिक शाळा बंद करण्याची कारणे…
👇👇
ज्ञान जीवनाचा आधार,व्यक्तिमत्त्वाचा विकास आहे.याचबरोबर ज्ञान माणसाच्या मनातील भ्रांत,अंधश्रद्धा आणि भीती दूर करतय.
ज्ञान प्रश्न निर्माण करते,प्रश्न विचारते,खासदार-आमदार-अधिकारी-कर्मचारी-मंत्री बनवतय.बरोबरी करायला शिकवतय!
ज्ञान विषमता नष्ट करण्यासाठी योगदान देतय,न्याय भुमिका घेतय,अन्यायाचा प्रतिकार करतय,अत्याचाराला हुसकावून लावतय!
ज्ञान योग्य निर्णय घेतय,समस्या निवारण करतय,सक्षम बनवतय,माणसांना सुधारतय!
यामुळेच खेड्यापाड्यातील शिक्षण बंद करण्यासाठी भाजपाच्या सत्ता काळात प्राथमिक शाळा बंद करण्याचा व शैक्षणिक बजेट कमी करण्याचा निर्णय झपाट्याने घेतला जात आहे.
याला कारणे म्हणजे,खेड्यापाड्यातील मुलांनी शिकून प्रगती करू नये,बरोबरी करू नये,सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारु नये.सत्ताधारी बनू नये, अधिकारी बनू नये,कर्मचारी बनू नये,स्वयंरोजगार निर्माण करु नये,स्वत:सह समाजाची सुधारणा करु नये,अडाणी बनून रहावे,हुजरेगिरी करावी,मान हालवणारे निर्बुद्ध लोक तयार व्हावे,भारत देशातील ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक-इतर मागासवर्गीयांना गुलाम बनवता यावे-गुलाम बनवून ठेवता यावे,परत मनुस्मृती नुसार मनुचा कायदा लागू करणे,या कायद्याला अनुसरून बहुजन समाजातील स्त्रि-पुरुषांचे हक्क नाकारणे,वर्ण व्यस्थातंर्गत जातीयवादाचे पालनपोषण करणे,यानुसार अत्याचार व अन्याय करणे,शोषण करणे,परावलंबी-निराधार बनविने!,
******
खेळ सत्तेचा व सत्तेबाहेरचा….
👇👇
“शाळा बंद करणे व शैक्षणिक बजेट कमी करणे हा सत्तेतील व सत्तेबाहेरील ब्राम्हणवाद्यांचा (मनुवाद्यांचा) खतरनाक छुपा अजेंडा आहे,हेच बहुजन समाजातील ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याकांना-इतर मागासवर्गीयांना समजत नसल्याने,तेच भाजपाचे व आर.एस.एस.आणि हिंदूत्वादी संघटनांचे,समर्थन करताना दिसतात….
ज्ञान शक्ती आहे,पण बहुजन समाजातील पुरुष-महिला,बेरोजगार,विद्यार्थी,शेतकरी,मजूर हे स्वत:च्या हक्कासाठी,प्रगतीसाठी,संरक्षणासाठी,उज्वल भविष्यासाठी,सुरक्षेसाठी,त्याच शक्तीशाली ज्ञानाचा उपयोग करताना दिसत नाही!…
मात्र स्वत:ला अप्रगत ठेवण्यासाठी,स्वत:चे अस्तित्व व हक्क नाकारण्यासाठी,मागे पडताना दिसतात आणि ब्राम्हणवादाच्या म्हणजेच मनुवादाच्या मागे धावताना दिसतात!”ज्या मनुवादी विचारांने यांना हजारो वर्षे गुलाम बनवून ठेवले होते.”यासारखी लाजिरवाणी बाब नाही!.
******
फ्रान्सेस बेकन…
👇👇
फ्रान्सेस बेकन यांनी म्हटल्याप्रमाणे, “ज्ञान ही शक्ती आहे,ज्या व्यक्तीकडे अधिक ज्ञान असते,ती व्यक्ती जीवनातील आव्हानांवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवू शकते.”असे भारतातील बहुजन लोक केव्हा करेल?
******
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयी मत…
👇👇
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” शिक्षण हे केवळ साक्षरता नसून,ते व्यक्तीला आत्मसन्मान मिळवून देते,हक्कांची जाणीव करुन देते आणि शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे हत्यार आहे.
तद्वतच त्यांनी समता,बंधुता,चारित्र्य आणि तांत्रिक शिक्षणावर त्यांनी भर दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते की,शिक्षण हेच शोषित,दलित आणि मागासवर्गीयांच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे.शिक्षणाने समाजात स्वातंत्र्य,समता आणि बंधुता निर्माण होऊ शकते.
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे आणि शिक्षण सर्व स्तरांपर्यंत पोहोचले पाहिजे,या मताचे ते होते.त्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे, असा आग्रह धरला.
महिला शिक्षणाला प्राधान्य देताना ते म्हणत, “मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे,यावरून मोजतो.”
केवळ पुस्तकी ज्ञान नाही,तर व्यक्तीचे चारित्र्य घडवणारे शिक्षण महत्त्वाचे आहे.शिक्षणामुळे माणसाला स्वतःच्या कर्तव्याची आणि हक्कांची जाणीव होते.
तद्वतच देशाच्या प्रगतीसाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षणाची नितांत गरज आहे,असे त्यांनी विचार मांडले होते.शिक्षणामुळे माणसाने स्वावलंबी बनले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,”शिक्षित व्हा,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मंत्र दिला,जो शिक्षणाला सामाजिक आणि राजकीय संघर्षाशी जोडतो.त्यांचे शैक्षणिक विचार मानवी कल्याणासाठी आणि स्वाभिमानी समाजाच्या निर्मितीसाठी आजही मार्गदर्शक आहेत.


