Home Social महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचे पुढाकारातून प्रेमियुगल विवाहबद्ध…

महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचे पुढाकारातून प्रेमियुगल विवाहबद्ध…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

     ओमप्रकाश मनोहर करसाल मु.पो. पलसगड ता.कुरखेडा जि. गडचिरोली आणि रागिणी संजय पुराम मु.गरगडा पो. चारभट्टी ता.कुरखेडा जि.गडचिरोली यांची मागील १ वर्षांपासून एकमेकांच्या गावात येता जाताना ओळखी झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.

          तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन आज दि. २४ रोज शुक्रवारला तंटामुक्त समिती पदाधिकारी, ग्रा.पं.पदाधिकारी यांचे उपस्थितीत दोघांचा विवाह सांस्कृतिक सभागृह ग्रा.पं.गेवर्धा या ठिकाणी पार पाडण्यात आला.आता पर्यंत समितीने मागील तिन वर्षाच्या कालावधीत दहा लग्न लावुन दिले व दहाही जोडपे गुण्यागोविंदाने संसार करित असल्याचं सांगितलं आहे.

       याप्रसंगी प्रशासक सुषमा मडावी,तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, पोलीस पाटील भाग्यरेखा वझाडे,माजी ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद,ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम,ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे,योगेश नखाते,रमेश कवडो,चरणदास मडावी, भुवनेश्वर कांबळे,प्रभाकर कुळमेथे,नवनाथ गोबाडे, गुरुदेव गावळे,ग्रा.पं. कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे,विनोद गावळे व गावकरी उपस्थित होते.