राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
नगर पंचायत कुरखेडा येथे प्रथमच नगररचना सहाय्यक म्हणून प्रणय चौधरी यांनी रुजू होऊन पदभार स्वीकारला आहे. शासनाच्या वतीने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, नगर विकासाच्या दृष्टीने ही महत्वाची बाब मानली जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष अनिताताई बोरकर यांच्या हस्ते प्रणय चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला सभापती सागर निरंकारी, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, जयेंद्रसिंह चंदेल तसेच अशोक कंगाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगररचना सहाय्यक पदामुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असून, भविष्यातील विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. उपस्थित मान्यवरांनी नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात शहराच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.



