राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
तालूक्यातील खेडेगांव (गेवर्धा) जगंलात सूरू असलेल्या मोठ्या जूगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज पहाटे दरम्यान स्थानिक गून्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कूरखेडा यांचा संयुक्त चमू द्वारे टाकण्यात आलेल्या धाडीत जूगार खेळणाऱ्या २२ आरोपींना अटक करीत ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कूरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडेगाव येथील निर्जन जगंलात रात्रीचा सूमारास अड्डा भरवत मोठ्या प्रमाणात जूगार खेळविण्यात येत असल्याच्या गोपनीय माहिती वरून स्थानिक गून्हे शाखा व पोलीस स्टेशन कूरखेडा येथील संयुक्त चमूने योजनाबद्धरीत्या मध्यरात्री एक वाजताचा सूमारास जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
यावेळी येथे ५२ ताश पत्त्याचा साहायाने पैशाची शर्यत लावत अवैधपणे जूगार खेळविताना मूख्य आरोपी एजाज शेख (कात्या) सह २२ आरोपी आढळून आले त्यांचा विरोधात जूगार प्रतिबंधक कायद्यान्वये गून्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आली.
तसेच घटणास्थळावरून २ लाख ७५ हजार २०० रूपये रोख,जूगार खेळण्याचे पत्ते,२३ जूने वापरते मोबाइल,१३ चारचाकी वाहने ६ दूचाकी असा ७१ लाख ८५ हजार ३३० रूपयाचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांचा मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले,स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण फेगडे,कूरखेडाचे ठाणेदार महेंद्र वाघ,स्थानिक गून्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंग दूल्हत,तसेच स्थानिक गून्हे शाखा व पोलीस स्टेशन कूरखेडा येथील संयुक्त चमू द्वारे करण्यात आली.



