Home Crime प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्या दोघांना वाहनांसह अटक… — एकूण ०९...

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्या दोघांना वाहनांसह अटक… — एकूण ०९ लाख ३० हजार ९९० रुपयांचा माल जप्त…

ऋषी सहारे 

   संपादक 

          आरमोरी पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारावर व मुखबीराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गोपाल निंबेकार याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात आणि दुसरा आरोपी यशवंत हर्षे याच्याही चार चाकी वाहनात सुगंधित तंबाखू मिळून आल्याने दोघाही आरोपींकडून मुद्देमालासह एकूण ०९ लाख ३० हजार ९९० रुपये किंमतीच्या सुगंधीत तंबाखू वाहतूक करणाऱ्या दोघांना वाहना सह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

         आरमोरी तालुक्यातील मौजा देऊळगाव येथे पोलीसांना गुप्त माहितीच्या आधारे आणि सुगंधित तंबाखू संबंधाने मुखबीराकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी सरेश पोसन्ना गडचिरोली यांचे प्राप्त माहितीनुसार आरोपी गोपाल निंबेकार वय ३९ वर्षे रा.देऊळगाव,ता.आरमोरी, जि.गडचिरोली.घटना मौजा देऊळगाव दक्षिणेकडे १२ कि.मी.अंतरावर दि. १८/४/२०२६ चे दरम्यान दाखल वेळ दि. २०/४/२०२६ यांचे घराचे घर झडती घेतली असता,त्यांचे राहते घरात आणि आरोपी यशवंत विठ्ठल हर्षे वय ४५ वर्षे रा.गिलगाव ता.जि.गडचिरोली या दोघांकडून २ पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये हिरव्या काळ्या रंगाचे पाऊस त्यावर होला हुक्का शीशा तंबाखू असे लिहलेले एकूण नग २० सिलबंद पाऊसची किंमत १३२५ /- या प्रमाणे २६,५००/- , १२ पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये केशरी रंगाचे ईगल हुक्का शीशा तंबाखू एकूण १३२/- सिलबंद नग विक्री किंमत ८५०/- असा १,१२,२००/-, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची वेगेनार चार चाकी वाहन क्र.एम.एच.३३ एसी ६२५६ अशी नंबर प्लेट असलेली तसेच घराच्या पोर्चमध्ये व गल्लीत पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखू इतर एकूण मुद्देमालासह ५,००,००० /- किंमतीचा माल मिळाला. ११ पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये हिरव्या काळ्या रंगाचे शीशा तंबाखू प्रती पाऊच १३२५/-या प्रमाने १,४५,७२०/-, पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये प्रति पाऊच किँमत २०७५/- प्रमाणे १२,४५०/- , खरड्या रंगाच्या बाॅक्समध्ये मजा १०८ मध्ये १० नग डब्बे प्रती बाॅक्स किंमत २८५०/- असा एकूण ७१,२५०/-, लाल पट्टा असलेल्या थैली मध्ये ८ नग १०८ मजा हुक्का ११३० /- प्रमाणे ९०४०/- , केसरयुक्त विमल पान मसाला ५० नग , तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू मिळून असा एकूण ०९ लाख ३० हजार ९९० रुपयाचा माल मिळून आला.

          पंचा समोर पंचनामा करून दोन आरोपींवर कलम १२३,२२३,२७४,२७५,अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे.दाखल अधिकारी किशोर मेश्राम,पुढील तपास आरमोरीचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात पोउपनि विजय चलाक करीत आहेत.