Home Crime कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत मौजा हेट्टी (दाबका) येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपच्या...

कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत मौजा हेट्टी (दाबका) येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपच्या केबल वायरवर चोरांनी मारला डल्ला…

दामोधर रामटेके

 कार्यकारी संपादक

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव गटग्रामपंचायत अंतर्गत मौजा हेटी (दाबका) येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपच्या केबल वायरवर चोरांनी डल्ला मारला असल्याची गंभीर घटना घडली.

        मात्र,केबल वायर चोरी प्रकरणी ग्रामसेवक घनश्याम उके यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे पुढे आले.

      मोटरपंपचा अंदाजे तिन प्रकारचा ३५ फुट केबल वायर केबल वायर चोरीला गेल्यामुळे मौजा हेट्टी (दाबका) येथील नागरिकांचा सध्या पाणी पुरवठा बंद झाला आहे.यामुळे हेट्टी येथील नागरिकांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था दुरापास्त झाली आहे.