शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
लघुलेखक पदभरती कायमस्वरूपी बंद करु नये या संदर्भात भाजपच्या माजी युवती प्रमुख प्रियंका चिताडे यांचे नेतृत्वात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी एक लेखी निवेदन माजी वने व सांस्कृतिक मंत्री तथा बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे आज सोमवार दि.२० एप्रिलला सादर केले.
या वेळी विद्यार्थ्यांंची संख्या मोठ्या प्रमाणात होती.सदरहू निवेदनाला आमदार मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे प्रियंका चिताडे यांनी सांगितले.



