युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
“क्रांतिबा फुले केवळ समस्यांची मांडणी करून थांबले नाहीत तर समस्येच्या निर्मूलनासाठी त्यांनी कृतिशिल कार्यक्रम आखला व राबविला व त्या माध्यमातून फुल्यांनी जुलमी व्यवस्थेला हादरे दिलेत, या अर्थाने फुले कृतिशिल क्रांतिकारक ठरतात.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. संतोष बनसोड यांनी केले.
अमरावती येथिल साईनगर स्थित नालंदा बुद्ध विहाराच्या भिम महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे, समाजसेवक सुनिल राणा आणि नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष एकनाथ वासनिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते.
तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाईंच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिक व विहाराच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईनगर परिसरातील बुद्ध विहार कृती समिती प्रमुख देवा शेंडे व उपमहापौर सचिन भेंडे यांना शाल-पुष्पगुच्छ व विहाराचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नालंदा बुद्ध विहाराचे सचिव सुरेश दांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र चवरे यांनी, तर अध्ययन मंच चे उपाध्यक्ष पद्माकर मांडवधरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. विहारासमोरील अशोकवाटिकेमध्ये नियोजित सभामंडपाची उभारणी केल्याबद्दल विहारातर्फे मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला विनायक दुधे, भगवान इंगळे, विलास मोहाडे, साहेबराव नाईक, चंदू रामटेके, अरुण रामटेके, पद्माकर मांडवधरे, सूरज मंडे, संजय रामटेके, रविंद्र गेडाम, सागर खंडारे, पुरुषोत्तम भटकर, प्रल्हाद इंगोले, भिमराव वसुकर नितीन खडसे, राजेश खंडारे, किशोर रक्षे, ओमप्रकाश रामटेके, सुनिल शेंडे, जानराव वाघमारे, अवधूत शेंडे, भिमराव दंदे, सत्यवान लांजेवार, सहदेव गजभिये, गौतम गजभिये, निलेश दांडगे, नागेश खोब्रागडे, छत्रपती पवार, नाना गवई, शैलेश मोहोड, सुनिल तायडे, प्रमोद मेश्राम, मनोहर दंदे, शंकर मेश्राम, भा.ई. सरकटे, वामनराव रामटेके, डॉ. बेले, प्रितम रामटेके, सुधाकर तलवारे, समाधान मोहोड, श्रीकृष्ण दहीकर, अरुण बडगे, अशोक खवड, डॉ. प्रदीप इंगोले, रमेश धाकडे, ॲड. प्रकाश खंडारे, खुशाल मेश्राम, अनिकेत पाटील, राजेंद्र मेश्राम, सचिन हांडे, हिम्मत नागदिवे, प्रेमदास इंगळे, दिनेश चापके, हंसराज श्रीरामे, डॉ. मनिष मोहोड, राजदीप लोखंडे, रामचंद्र खंडारे, सरदार, निलेश मेश्राम, प्रशांत भगेवार तसेच मातोश्री रमाई महिला मंडळाच्या रमा दंदे, वंदना चवरे, महानंदा वासनिक, इंदिरा दुधे, कुंजलता गेडाम, संगिता मंडे, सुनिता रामटेके, साधना इंगळे, पुष्पलता वसुकर, अनिता गवई, शिला तायडे, सुनंदा भोवते, सुजाता बडगे, ढोके ताई, कमला वासनिक, अंजली अडकणे, रेखा टेंभुरणे, सरला दांडगे, मिना पारवे, योगिता सरोदे, वंदना नन्नावरे, सुजाता बनसोड,विद्या खंडारे, प्रिती दुधे, रमा दवणे, यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



