राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात बैठकीचा धडाका सुरु झाला असुन त्या अभियान अंतर्गत कुरखेडा येथे कुरखेडा कोरची तालुका कांग्रेस पदाधिकारी व लोकप्रतिनिधिंची बैठक किसान मंगल कार्यालय येथे महत्त्वपूर्बठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य ,गडचिरोलि कांग्रेस कमिटी निरीक्षक तथा राजस्थान विधानसभेचे आमदार श्री मनीषजी यादव,उमरेड़ चे आमदार संजय मेश्राम,आमदार रामदास मसराम,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कांग्रेस पक्षाचे जिल्हा, तालुका संघटन मजबूत करणे,युवा कार्यकर्ताना पक्षात सामावून योग्य पद,व संघटन वाढवण्याची जवाबदारि देणे हा या अभियानचा उद्देश असल्याचे यादव यांनी सांगितले.तसेच सत्ताधारी आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात जिल्ह्यातील वन सम्पदा सुपीक जमीनी घालण्याचा डाव आहे तो उधळून लावाअसे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक आमदार मनिष मेश्राम यांनी केले. आमदार श्री संजयजी मेष्राम, आमदार श्री रामदास मसराम,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी ही पदाधिकारी याना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कांग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कूरखेडा चे जिवन पाटिल नाट,कोरची चे मनोज अग्रवाल,धानोरा चे प्रशांत कोराम,आदिवासी कांग्रेस सेल चे जिल्हाध्यक्ष माधव गावळ,युवक कांग्रेस चे नितेश राठोड़,कोरचि नगराध्यक्ष हर्षलता भैसारे,सभापति प्राचि धोंडणे,महिला तालुकाध्यक्ष आशा तुलावी,आशा कुमरे,जयंत हरडे,कपिल पेन्दाम,गिरीधर तितराम,श्रीराम दुगा,कुंदा तितिरमारे,सदरुभाई भामाणी,रामसुराम काटेंगे,वसीम पठाण,तुकाराम मरगये,भावेश मुंगणकर,प्रांजळ धाबेकर,दिनेश सिड़ाम,संजय कवाडकर सह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य, विविध सेल व फ्रंटल संघटनांचे तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



