Home Social विपरीत-कठीण-प्रतिकूल परिस्थिती,कृती,दुराग्रह भावना आणि कटकारस्थान!..‌‌.‌

विपरीत-कठीण-प्रतिकूल परिस्थिती,कृती,दुराग्रह भावना आणि कटकारस्थान!..‌‌.‌

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

          विपरीत परिस्थिती म्हणजे आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध,कठीण,प्रतिकूल किंवा आव्हानात्मक वेळ होय.यालाच ‘बिकट परिस्थिती’, ‘संकटकाळ’ किंवा ‘प्रतिकूल परिस्थिती’ असेही म्हणतात.

       विपरीत परिस्थितीत अनेक लोकांवर आर्थिक संकटे येतात.या संकटाला अनुसरून त्यांचे जिवन दारिद्र्याने वेढले जाते.तद्वतच अशा परिस्थितीत सदर नागरिक हतबल होतात,त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे व यशस्वी आयुष्याचे मार्ग रोखले जातात.

       याचबरोबर संकटकाळात नागरिकांच्या नोकऱ्या जातात,काही नागरिकांचा रोजगार हिरावला जातोय,तर काही नागरिक अनपेक्षितपणे अळचणीत येतात.यामुळे संबंधित व्यक्तींना किंवा घरातील व्यक्तींना गंभीर तथा अनेक प्रकारच्या चिंताद्वारे गंभीर आजार जळतात.

         तद्वतच नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच दुष्काळ,पूर,भूकंप,वादळ यामुळे होणारे नुकसान आपत्तीग्रस्तांच्या मनावर गडद परिणाम पाडतात.

        संकटामुळे सामाजिक तथा कौटुंबिक दबाव येतो,कौटुंबिक कलह वाढतो,समाजात मानहानी होते,नातेसंबंधात तणाव वाढतात किंवा जाणिवपूर्वक तनाव निर्माण केले जातात.

        याचबरोबर विपरीत परिस्थितीत मानसिक तणाव वाढतो,मन सातत्याने चिंताग्रस्त होतं,मनात अनेक प्रकारचे नैराश्य पसरतं,मनातील आत्मविश्वास कमी होतयं.

         म्हणूनच अशा लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवन जगण्यासाठी रोजच्या रोज संघर्ष करावा लागतो.त्यांना कठीण वेळेला अनुसरून आवश्यक ध्येय साध्य करता येत नाही.

       पण,विपरीत परिस्थितीवर मात कशी करावी? याची जाणीव सुध्दा कठीण परिस्थितीत जगणाऱ्या लोकांना माहिती असते.म्हणूनच,विपरीत-कठीण-प्रतिकुल परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी ते जिद्द व चिकाटीने संघर्ष करताना दिसतात.

       अशा नागरिकांची कधी लवकर परिस्थिती रुळावर येते तर कधी त्यांची परिस्थिती रुळावर यायला बरीच वर्षे लागतात.मात्र संकटासमोर हार न मानता,संकटातून बाहेर पडण्यासाठी लढा देण्याची तयारी कठीण परिस्थितीतील लोक नेहमी ठेवतात.

       “ही वेळ निघून जाईल” असा विश्वास ते ठेवतात.यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सकारात्मक दृष्टिकोन असतोय.

          मेहनतीला पर्याय नाही.विपरीत परिस्थितीतूनच मोठे यश जन्म घेते हा आशावाद उराशी बाळगून,विपरीत परिस्थितीत जिवन जगणारे कठोर परिश्रम घेतात.आर्थिक किंवा कामाचे योग्य नियोजन करून संकटाचा सामना करणे हा त्यांच्या आयुष्यातील भागच असतो!,”विपरीत परिस्थिती ही माणसाच्या सहनशक्तीची आणि जिद्दीची परीक्षा असते.

       जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते,तेव्हा व्यक्तीला कठीण समयी संघर्ष आणि आव्हानांचा सामना करावा लागतो.पण,अशा काळातही संबंधित व्यक्तींनी धीर न सोडता आशावादी राहणेच गरजे आहे.

      परिस्थिती आहे तशी स्वीकारून,त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हाच एकमेव उपाय आहे.

विपरित,कठीण,प्रतिकूल परिस्थितीत जगणारे लोक…

       विपरीत,कठीण,प्रतिकूल परिस्थितीत जिवन जगणारे लोक,लढा देणारे लोक असतात,हे लोक संकटाला घाबरत नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही ते आत्मविश्वासाने उभे राहतात,मार्ग शोधतात आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात.ते मानसिकदृष्ट्या खंबीर असतात.

        हेच लोक परिस्थितीवर राग व्यक्त करण्याऐवजी किंवा भावनिक होण्याऐवजी ती परिस्थिती शांतपणे स्वीकारतात.ते अशा परिस्थितीत स्वतःला कसे जुळवून घ्यायचे,याचा विचार करतात.

       कठीण,विपरीत,प्रतिकूल परिस्थितीला काही लोक आव्हाने म्हणून स्वीकारतात,तर काही लोक अशा परिस्थितीला जिवनातील कठीणातला कठीण संघर्ष समजतात.

खरे रुप व भुमिका….

        विपरीत किंवा संकटाच्या परिस्थितीत,लोकांचे खरे रूप समोर येते.जेव्हा वेळ वाईट असते,तेव्हा काही लोक मदतीऐवजी शत्रूसारखे वागतात.

        असे लोक तोंडावर मित्र बनून राहतात,परंतु वेळ आल्यावर पाठीमागून वार करतात,असेही पुढे आले आहे. 

        याचबरोबर असे लोक खूप धूर्त असतात.ते विश्वासार्ह नसतात,ते लोक वाईट काळात सर्वात आधी सोडून जातात. 

       तद्वतच ज्यांना आपण जवळचे लोक माणतो,तेच लोक संकटाच्या वेळी सर्वात जास्त नुकसान करतात,जे घातक असतात. 

     संकटाच्या वेळी मदतीचा हात देण्याऐवजी,आपल्या स्वभावाप्रमाणे जे लोक संधीसाधू प्रमाणे वागतात,तेच खरे शत्रू ठरतात.

हेच वास्तव!….

       विपरीत,कठीण,प्रतिकुल परिस्थितीत अडकलेले व्यक्ती अळचणीत खरे बोलत असले तरी काही समस्यांचे निराकरण त्यांना बोलल्याप्रमाणे करता येत नाही.अर्थात बोलल्याप्रमाणे कृती करता येत नाही.

        अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडथळे आणली जातात,किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टींमुळे त्यांना बदनाम केले जातयं,त्यांच्या चारित्र्यांचे हनन केले जातयं,त्यांना खोटं ठरवलं जातयं,त्यांना बेईमान म्हटल जातय,सार्वजनिकरित्या त्यांची प्रतिष्ठा घालवली जातयं,त्यांना लोफर म्हटलं जातय,त्यांना मानसिक व वैचारिक कृतीतून त्रास दिल्या जातयं!,त्यांना संपविण्यासाठी कट रचल्या जातय,त्यांना विविध शब्दातंर्गत छडल्या जातय..

          अशा वेळी,”माणसे,त्यांची सहानुभूती आणि माणुसकी,दूरदूर दिसत नाही.

       यामुळे कठीण परिस्थिती जिवन जगणाऱ्या लोकांच्या मानवी मनाला हादऱ्यावर हादरे तर बसतातच,पण त्यांना अमानवीय दृष्टीचा आधार घेत पुर्णतः तोडून टाकल जातय,त्यांना मरनासंन्न परिस्थितीत आणून सोडलं जातय!…

       हेच प्रतिकूल,कठीण,विपरित परिस्थितीचे भयानक वास्तव!…